महागडे क्रीम, फेसपॅक लावण्याची गरजच नाही; ६ पदार्थ खा, वय वाढलं तरी त्वचा राहील तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 15:21 IST2024-12-28T15:15:10+5:302024-12-28T15:21:40+5:30

त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी, त्वचा तरुण- सुंदर दिसण्यासाठी आपण महागडे क्रीम, फेसपॅक यांचा नेहमीच वापर करतो. पण तरीही त्वचेवर हवा तसा बदल दिसून येत नाही. किंवा बदल झाला तरी तो काही दिवसांपुरताच असतो.
याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण त्वचेला फक्त वरवरचं पोषण देतो. जर खऱ्या अर्थाने त्वचेचा पोत सुधारायचा असेल तर त्यासाठी आहारातच काही बदल करणे गरजेचे आहे.(diet for healthy skin)
त्यासाठी कोणते पदार्थ नियमितपणे खायला पाहिजे (superfood for young and glowing skin), त्याची माहिती डॉक्टरांनी baatein_fitness_ki या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यानुसार काही पदार्थ नियमितपणे खाऊन पाहा (which food is best for skin health?). काही दिवसांतच तुमच्या त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसेल असं डॉक्टर सांगतात.
दिवसाची सुरुवात आवळ्याचा रस पिऊन करा. कारण आवळा ज्यूसमध्ये असणारे व्हिटॅमिन सी त्वचेला नेहमीच तरुण ठेवते.
तुमच्या नाश्त्यामध्ये सुकामेवा अवश्य असला पाहिजे. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, मॅग्नेशियम, झिंक त्वचेसाठी उपयुक्त ठरतात.
दुपारच्या जेवणात काकडी आणि पुदिन्याचं रायतं खा. त्याचा त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.
डाळिंब आणि पपई ही फळं नियमितपणे खा. ही दोन्ही फळं त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी बदाम टाकलेलं दूध प्या. त्वचा चमकदार होऊन सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल.