लग्नसोहळ्यात चिमुकली लेक दिसेल परी, पाहा छोट्या 'करवली'साठी कस्टमाइज्ड नऊवारी साडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 20:00 IST2026-02-19T20:00:00+5:302026-02-19T20:00:02+5:30

customized nauvari saree for girls : nauvari saree for small girls : traditional nauvari saree for girls : girls nauvari saree for wedding function : लग्नात नेहमीचे रेडिमेड कपडे घेण्यापेक्षा, आता ट्रेंड आहे तो 'कस्टमाइज्ड वर्क ब्लाऊज' आणि पारंपरिक 'नऊवारी' साडीचा....

'लग्न' म्हटलं की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच धावपळ सुरू होते. विशेषतः घरात मामा, काका किंवा आत्या, मावशीचं लग्न असेल, तर घरातील छोट्या लाडक्या लेकीचा उत्साह गगनात मावेनासा असतो. या घरातीलच (customized nauvari saree for little girls) लग्नात आपली चिमुकली 'छोटी करवली' म्हणून मिरवणार म्हणजे तिचा लूक एकदम खासच असायला हवा!

घरातीलच अत्यंत जवळच्या लग्नात नेहमीचे रेडिमेड कपडे घेण्यापेक्षा, आता ट्रेंड आहे तो 'कस्टमाइज्ड वर्क ब्लाऊज' आणि पारंपरिक 'नऊवारी' साडीचा.(wedding nauvari saree ideas for young girls)

साध्या साडीपेक्षा नऊवारी साडीमध्ये मुलींचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, पण तिला आधुनिक टच देण्यासाठी त्यावर हाताने नक्षीकाम केलेले किंवा लेकीच्या नावाचे किंवा ज्यांचे लग्न आहे त्यांची करवली म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे कस्टमायझेशन असलेले ब्लाऊज आजकाल खूपच लोकप्रिय होत आहेत.

आजकल केवळ दागिने किंवा साडीच नाही, तर ब्लाऊजच्या पाठीवर असलेल्या खास संदेशांमुळे करवलीचा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. 'मामाची करवली' किंवा 'मावशीची लाडकी' असे रेशमी धाग्यांनी आणि जरीकामाने विणलेले शब्द जेव्हा ब्लाऊजवर दिसतात तेव्हा त्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा अधिकच वाढतो. हा केवळ पेहराव नसून तो एक सुंदर आठवण देणारा खास क्षण आहे.

ब्लाऊजच्या पाठीवर सुबक जरीकामाने 'मामाची करवली' 'मावशीची करवली' असे लिहिलेले असते. यासोबत साडीला मॅचिंग असे गोंडे किंवा लटकन लावल्याने तो अधिक आकर्षक दिसतो.

नक्षीदार फुलांच्या वेलींच्या मध्ये 'मावशीची लाडकी' असे शब्द गुंफलेले ब्लाऊज. हे डिझाईन दिसायला अतिशय रॉयल आणि उठावदार दिसते.

ब्लाऊजच्या दोरीला लटकवलेल्या छोट्या कापडी लटकनवर देखील लेकीचे नाव किंवा संदेश लिहिलेला असतो, जो चालताना अधिक सुंदर वाटतो.

लग्नाचे प्रतीक म्हणून पालखीचे चित्र आणि त्याखाली संदेश लिहिलेले ब्लाऊज, जे करवलीला लग्नाच्या मांडवात 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' बनवते.

जर साडी सिल्कची असेल, तर त्यावर मोत्यांनी 'करवली' असे लिहिलेले ब्लाऊज खूपच 'रॉयल' लूक देतात.

ब्लाऊजच्या पाठीवर जरीकामाने शहनाई किंवा कलश काढलेला असतो आणि त्याच्या मध्यभागी 'मावशीची लाडकी' असे विणलेले असते.

पाठीवर गोलाकार किंवा चौकोनी कट देऊन त्याच्या आजूबाजूला 'मामाची परी' असे कस्टमाइज्ड जरीकाम केलेले असते.

काही लोक एम्ब्रॉयडरी ऐवजी कापडावर खास रंगांनी सुंदर संदेश आणि चित्रे काढून घेतात, जे वजनाला हलके आणि आकर्षक असतात.

गडद रंगाच्या साडीवर सोनेरी किंवा चांदीच्या धाग्याचे वर्क जास्त उठून दिसते, तर फिकट रंगाच्या साडीवर गडद रेशमी धाग्यांचा वापर करावा. कस्टमाइज्ड ब्लाऊजला पाठीमागे दोन किंवा तीन दोऱ्या असाव्यात आणि त्याला साडीच्या रंगाचे मोठे गोंडे किंवा घुंगरू लावल्यास करवलीचा थाट वाढतो.

या नऊवारी साडीतील लेकीचा लूक अधिकच आकर्षक व सुंदर करण्यासाठी तुम्ही साडीच्या रंगाला मॅचिंग किंवा काँट्रास्ट रंगाचा देखणा फेटा देखील तुम्हाला हवा तसा कस्टमाइज्ड करुन घेऊ शकता.

जर तुम्हाला डिझायनर साडी नको असेल आपण पारंपरिक वेलबुट्टी असणाऱ्या पैठणी साडीची देखील रेडिमेड नऊवारी साडी शिवून घेऊ शकता.

लहान मुलींना टोचू नये म्हणून ब्लाऊजला आतून सुती अस्तर लावून घेणे गरजेचे आहे.

शेवटी, मामा, काका किंवा आत्या, मावशीच्या लग्नात तुमची लेक जेव्हा 'करवली' म्हणून सजते, तेव्हा ती केवळ एक पाहुणी नसते, तर त्या सोहळ्याची शोभा असते.