तळणीचे पदार्थ होणार नाही तेलकट! शेफ संजीव कपूर सांगतात १ ट्रिक, तेल न पिता होतील कुरकुरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 09:45 IST2026-02-17T16:00:15+5:302026-02-18T09:45:38+5:30

chef sanjeev kapoor frying tips : deep frying tips by sanjeev kapoor : deep frying tricks for crispy food : तळण्याची योग्य पद्धत आणि साध्या किचन टिप्स फॉलो केल्या तर कोणताही पदार्थ तेलकट होणार नाही, पाहा १० टिप्स...

भजी, वडे किंवा समोसे म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं, पण अनेकदा हे पदार्थ इतके तेलकट होतात की खाण्याची इच्छाच मरून जाते. पदार्थ जास्त तेल ओढून घेतात आणि मग आरोग्याची चिंता सतावू लागते. पण आता टेन्शन घेऊ नका! मास्टरशेफ संजीव कपूर (deep frying tips by sanjeev kapoor) यांनी अशा काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमचे पदार्थ बाहेरून कुरकुरीत होतील आणि आतून अजिबात तेलकट राहणार नाहीत.

भजी, पुरी, वडा किंवा कोणताही तळलेला पदार्थ योग्य पद्धतीने (deep frying tricks for crispy food) तयार केला नाही, तर तो अतिरिक्त तेल शोषून घेतो. त्यामुळे पदार्थ कुरकुरीत होण्याऐवजी जड आणि तेलकट होतो. प्रसिद्ध शेफ Sanjeev Kapoor यांच्या मते, तळण्याची योग्य पद्धत आणि काही साध्या किचन टिप्स फॉलो केल्या तर कोणताही पदार्थ कमी तेलकट, हलका आणि परफेक्ट कुरकुरीत करता येतो. तेलाचे तापमान, बॅटरची कन्सिस्टन्सी आणि तळताना घेतलेली काळजी आणि काही खास टिप्स यामुळे पदार्थांची चव आणि टेक्श्चर दोन्ही सुधारतात.

संजीव कपूर यांच्या मते, डीप फ्राइंगसाठी 'न्यूट्रल' चव असलेले तेल निवडावे. तळण्यासाठी वापरात येणाऱ्या तेलाला स्वतःची अशी चव नसावी, तसेच तेलाचा वास उग्र नसावा. पदार्थ तळण्यापूर्वी तेल योग्य प्रमाणांत गरम केलेले असावे. जर तेल कमी तापलेले असेल, तर पदार्थ जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात. तळण्यापूर्वी पदार्थ पूर्णपणे कोरडे असावेत, कारण ओलाव्यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि पदार्थ तेलकट बनतात. पदार्थ तेलातून काढल्यानंतर ते त्वरित टिशू पेपरवर ठेवावेत, जेणेकरून जास्तीचे तेल शोषले जाईल.

तेल खूप जास्त गरम नसावे (नाहीतर पदार्थ बाहेरून जळतो आणि आतून कच्चा राहतो) आणि खूप थंडही नसावे (नाहीतर पदार्थ जास्त तेल शोषून घेतो).

तळण्यापूर्वी पदार्थ पूर्णपणे कोरडे असावेत, कारण ओलावा किंवा पाणी असेल तर तेलाचे कण उडतात आणि भाजण्याचा धोका असतो.

कढईत एकाचवेळी खूप जास्त पदार्थ एकदम तळण्यासाठी घालू नका. थोड्या थोड्या प्रमाणात तळल्यास प्रत्येक पदार्थांचा तुकडा व्यवस्थित फ्राय होतो.

तळण्यापूर्वी थोडे बॅटर तेलात टाकून पहा. जर ते लगेच वर आले तर समजावे की तेल तळण्यासाठी तयार आहे.

कटलेट किंवा स्नॅक्सला लावलेले जास्तीचे ब्रेड क्रंब्स किंवा रवा तळण्यापूर्वी हलके झटकून घ्या. नाहीतर हे क्रंब्स तेलात पडून जळतात आणि पुढच्या पदार्थांची चव खराब करतात.

तळताना संयम राखणे खूप गरजेचे असते. पदार्थ वारंवार उलटण्याची गरज नसते; पदार्थांची जास्त उलथापालथ केल्यास पदार्थ तुटू शकतो आणि तुमचे तेल खराब होऊ शकते.

तळण्यासाठी छिद्र असलेला झारा वापरावा, जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल. तसेच, खोल आणि खालून गोल असलेल्या कढईत कमी तेलात चांगले तळण होते.

तळताना कांदा, कोथिंबीर किंवा मसाल्याचे छोटे तुकडे तेलात जळतात. प्रत्येक वेळी काहीतरी तळून झाल्यावर हे जळलेले तुकडे काढून टाकावेत, जेणेकरून पुढच्या पदार्थाची चव बिघडणार नाही.

तुम्ही जे काही तळत आहात त्याचे सर्व तुकडे एकाच आकाराचे असावेत. यामुळे सर्व तुकडे एकाच वेळी आणि सारखे शिजतात; कोणताही तुकडा कच्चा राहत नाही किंवा जास्त जळत नाही.