हुबेहुब आलिया भटसारखी दिसणारी कोण ही मुलगी? ती का म्हणतेय, मला आलिया म्हणू नका..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 17:37 IST2022-07-05T15:36:47+5:302022-07-05T17:37:24+5:30
Celesty Bairagi Who looklike Alia Bhat : तिचं दिसणं, हसणं, असणं सगळंच आलियासारखं, पाहा एकसे एक फोटोज

माधुरी दिक्षित, ऐश्वर्या राय किंवा दिपिका पदुकोण यांच्या सौंदर्याने जगभरातील लोक घायाळ होतात. त्यांच्याइतकेच आपणही देखणे दिसावे असे अनेक तरुणींना वाटते. पण एकासारखीच दुसरी व्यक्ती नसते, त्यामुळे आपली इच्छा इच्छाच राहते. मग कधी आपण त्यांच्यासारखी कपड्यांची फॅशन करतो तर कधी त्यांची हेअरस्टाइल, मेकअप यांची कॉपी करतो (Celesty Bairagi Who looklike Alia Bhat).
पण एक तरुणी अशी आहे जी हुबेहुब अभिनेत्री आलिया भटसारखी दिसते. तिचा फोटो पाहिला की पटकन आलियाचाच भास होतो इतकी ती आलियासारखी दिसते. बॉलिवूडच्या अभिनेत्रीसारखा चेहरा मिळण्याचे भाग्य क्वचितच कोणाला लाभत असले.
सेलेस्टी बैरागी असं या तरुणीचं नाव असून तिच्या शरीराची ठेवण, रंग, उंची, तिला पडणारी खळी आणि चेहरा अगदी आलिया भटसारखा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही ती बरीच प्रसिद्ध आहे. तिला पाहिल्यावर काही सेकंदांसाठी आलियाच आपल्या समोर आहे असे वाटू शकते इतके या दोघींमध्ये साम्य आहे.
आपल्याला अभिनेत्री म्हणून आलिया भट खूप आवडते पण आपली ओळख ही तिच्यासारखी दिसणारी अशी न होता वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी असं मुंबईत राहणाऱ्या सेलेस्टीचं म्हणणं आहे. तिलाही अभिनयाच्याच क्षेत्रात करिअर करायचे असून त्यादृष्टीने ती प्रयत्नशील आहे.
सेलेस्टीचे आणि आलियाचे डोळे थोडे वेगळे असून गॉगल घालून साडी नेसल्यावर तर ती सेम टू सेम आलियासारखीच दिसते. इतकेच नाही तर सेलेस्टीची हातवारे करण्याची पद्धत, बोलण्याची, हसण्याची स्टाईलही अगदीच आलिया असून सोशल मीडियावर तिला आलियाची लहान बहिण किंवा आलियाची डुप्लिकेट असेच म्हणतात.
जगात एकसारखे दिसणारे ७ लोक असतात असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे सेलेस्टी आणि आलिया आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आलियाशिवाय बॉलिवूडमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करीना कपूर आणि काजोल यांच्यासारखे दिसणारे काही जणही समोर आले होते. अशाप्रकारे हुबेहूब दिसणाऱ्यांना स्टंट करण्याचे काम सहज मिळू शकते.
आलिया भटसारखी दिसत असल्याने सेलेस्टी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ८० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा ड्रेसिंग सेन्स, कॅमेराला पोज देण्याची पद्धत हीसुद्धा आलियाशी जुळत असल्याचे फॅन्सचे म्हणणे आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी तिला आलियाची कॉपी असेच नाव ठेवले आहे.
सेलस्टी हिने काही आसामी संगीत व्हिडिओ रेकॉर्ड केलेल आहेत. याशिवाय मॉडेल म्हणूनही तिने काही लहान कामे केली असून आता बॉलिवूडमध्ये जाण्याच्या दृष्टीने तिची तयारी सुरू आहे.