1 / 6ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड वाढत आहे. कोणताही आजार एकदम होत नाही. आपलं शरीर त्याआधी आपल्याला काही सूचना देत असतं. तसंच काहीसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीतही होतं. पण अज्ञानामुळे किंवा स्वत:च्या दुखण्याखुपण्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे भारतीय महिला काही त्रास होऊनही तो अंगावर काढतात आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर पसरत जातो.2 / 6कॅन्सर हा असा आजार आहे की जेव्हा तो सुरुवातीच्या टप्प्यात असतो, तेव्हाच त्यावर तातडीने उपचार घ्यावेत. जेणेकरून रुग्ण त्यातून पूर्णपणे बरा होऊन बाहेर येऊ शकतो. म्हणूनच ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला दिसणारी ही काही लक्षणं प्रत्येक स्त्रीला माहितीच असावीत..3 / 6पहिलं लक्षण म्हणजे स्तनांमध्ये अचानक जडपणा वाटू लागणं. एखादा स्तन जड झाल्यासारखा वाटला तर स्वस्तन चाचणी करा. आत कुठे गाठ लागते आहे का ते तपासा आणि तसं असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.4 / 6डॉ. अरुण गिरी यांनी हेल्थसाईटला दिलेल्या माहितीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला स्तन आणि स्तनाग्रांचा रंगही नेहमीपेक्षा वेगळा दिसते.5 / 6तसेच स्तनाग्र आत ओढल्यासारखे वाटतात. असं काही लक्षण दिसलं तर वेळ न घालवता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.6 / 6चौथं लक्षण म्हणजे स्तनाग्रांमधून पाणी येणं. हे खूप धोक्याचं लक्षण आहे. ते ब्रेस्ट कॅन्सरमुळेच होतं असं नाही. पण तरीही असं काही तुमच्या बाबतीत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.