ब्लाऊजच्या स्लिव्हजचे १० नवीन पॅटर्न; पफ- बलून स्लिव्हजच्या फॅन्सी डिजाईन्स, दिसा फॅशनेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:58 IST2025-11-09T15:43:10+5:302025-11-11T17:58:04+5:30

Blouse Puff Sleeves New Designs : हा ट्रेंड खरंतर १९७० च्या दशकातील फॅशनचा भाग होता. जो आता अधुनिक आणि आकर्षक डिजाईन्ससह परत आला आहे.

पफ आणि बलून स्लिव्हजचे ब्लाऊजेस (Blouse Puff Sleeves New Designs) सध्या साडी फॅशनमध्ये बरेच लोकप्रिय आहेत आणि अनेकजण ते पसंत करत आहेत. (Blouse New Patterns Puff Sleeves Balloon New Designs)

हा ट्रेंड खरंतर १९७० च्या दशकातील फॅशनचा भाग होता. जो आता अधुनिक आणि आकर्षक डिजाईन्ससह परत आला आहे.

या बाह्यांमुळे साडीला एक ग्लॅमरस आणि पार्टीवेअर लूक मिळतो. हे ब्लाऊज डिजाईन्स तुमच्या खांद्याच्या आणि हाताचा भाग अधिक उठावदार दाखवतात.

खांद्याच्या भागावर लहान किंवा मध्यम फुग्याच्या आकाराच्या पफ बाह्या असलेले ब्लाऊज पारंपारीक आणि ट्रेंडी दोन्ही लूक देतात. कोपरापर्यंत पफ बाह्या साडीवर खूप सुंदर दिसतात.

बलून स्लिव्हज ब्लाऊजमध्ये बाह्या खांद्यापासून मनगटापर्यंत पूर्णपणे फुगीर असतात आणि मनगटाजवळ पट्टी असते.

ऑर्गेंजा, नेट, रेशिम यांसारख्या फॅब्रिकमध्ये बाह्या अधिक आकर्षक दिसतात. कारण हो फॅब्रिक्स आवश्यक असलेला फुगीर भाग चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात.

या बाह्यांचा फुगीरपणा आणि आकर्षकता टिकवण्यासाठी ब्लाऊजची फिटिंग छाती आणि कंबरपट्टीवर व्यवस्थित असावी लागते.

हा ट्रेंडी पॅटर्न एथनिक आणि वेस्टर्नचासुद्धा टच देतो.