लग्नसोहळा स्पेशल आरी वर्क ब्लाऊज, २००० रुपयांपेक्षा कमी किमतीत-पाहा सुंदर डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:13 IST2026-02-26T14:15:01+5:302026-02-26T17:13:34+5:30

Blouse Aari Work Designs : आरी वर्कची मोठी खासियत म्हणजे तुमच्या आवडीनुसार आणि साडीच्या रंगाप्रमाणे कस्टमाईज्ड डिझाईन्स बनवून घेऊ शकता.

लग्नसराईच्या सिजनमध्ये आजकाल कोणीही प्लेन ब्लाऊज घालणं पसंत करत नाही. प्रत्येकाला आरी वर्क केलेले सुंदर ब्लाऊजच हवे असतात. (Blouse Aari Work Designs Under 2k)

काठापदाराच्या साडीवरील ब्लाऊजला साजेश्या डिझाईनचे आरीवर्क केले तर एक रॉयल लूक मिळतो आणि तु्म्ही सर्वात उठून दिसता.

यामध्ये रेशमी धागे, मणी, कुंदन आणि सोन्या-चांदीच्या जरीचा वापर करून नक्षीकाम केले जाते.

फुलांच्या नाजूक वेली आणि पानांच्या नक्षीवर आधारीक डिझाईन्स सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत.

वधूचा लेहंगा किंवा ब्लाऊजवर जरदोसीचे काम केल्यामुळे त्याला एक भरगच्च आणि वजनदार लूक मिळतो.

मोर किंवा कुहिरी, नथ हे पारंपारी पॅटर्न्स आजही ब्लाऊजच्या आरी वर्क डिझाईन्समध्ये पाहायला मिळतात.

ज्यांना जास्त भरगच्च ब्लाऊज आवडत नाही ते फक्त बॉर्डरला आरी वर्क करून घेऊ शकतात.

हे सर्व काम हातानं केले जात असल्यामुळे थोडे महाग असते पण प्रत्येक डिझाईनमधील फिनिशिनंग ही अतिशय उत्कृष्ट आणि उठावदार दिसते.

आरी वर्कची मोठी खासियत म्हणजे तुमच्या आवडीनुसार आणि साडीच्या रंगाप्रमाणे कस्टमाईज्ड डिझाईन्स बनवून घेऊ शकता.

आरी वर्क ही कधीही जुनी न होणारी कला आहे. त्यामुळे आरी वर्कचे ब्लाऊज तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता.