सिल्कची साडी ड्राय क्लिनला देण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी, चमक न जाता साडी दिसेल नवीकोरी अनेक वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 18:57 IST2025-08-26T18:55:11+5:302025-08-26T18:57:48+5:30
Silk saree dry cleaning tips : How to care for silk saree: Silk saree maintenance: सिल्कची साडी नेसणार असाल तर ड्राय क्लिनिंगला देण्यापूर्वी या ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा.

सणसमारंभात सिल्कची साडी ही आवर्जून घातली जाते. तिचा लखलखता पोत, रंगांची झळाळी आणि देखणेपणामुळे ती अधिकच सुंदर दिसू लागते. पण याची खरी काळजी घेणं असतं ते ड्राय क्लिनिंगला देताना. चुकीच्या पद्धतीने ही साडी धुतल्यास त्याचा पोत खराब होतो, रंग फिका पडतो. ज्यामुळे ही साडी पुन्हा वापरण्यायोग्य नसते. (Silk saree dry cleaning tips)
जर यंदा गणपतीत किंवा सणसमारंभात सिल्कची साडी नेसणार असाल तर ड्राय क्लिनिंगला देण्यापूर्वी या ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा. (How to care for silk saree)
प्युअर सिल्कची साडी प्रत्येक वेळा नेसल्यानंतर धुवू नका. साडी नेसल्यानंतर ती पूर्णपणे खोलून बेडवर वाळवा. ज्यामुळे ती एअर ड्राय होईल. मग त्यानंतर त्याला प्रेस करुन घडी घाला. Steam iron किंवा Roll Press सुद्धा करायचं नाही.
सिल्कची साडी प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ठेवू नका. सिल्कची साडी ठेवताना त्यावर १० साड्या ठेवू नका. जास्तीत जास्त ३ ते ४ साड्या एकमेकांवर ठेवा.
मॉइश्चरायझर घालवण्यासाठी कपाटामध्ये सुकलेल्या कडुलिंबाची पानं ठेवा. ज्यामुळे कपाटातील ओलावा किंवा कुबटपणा शोषून घेतला जाईल. तसेच तांदूळ, लवंग किंवा दालचिनीची पोटली करुन आपण कपाटात ठेवू शकतो. ज्यामुळे सिल्कची साडी किंवा कपाटातील इतर कपडे नीट राहातील.
सिल्कच्या साडीवर चुकूनही डांबराच्या गोळ्या ठेवू नका. यामुळे साडीवर डाग पडतात. साडी धुताना ती गरम पाण्यात धुवू नका. यामुळे रंग जाऊ शकतो. तसेच केमिकलयुक्त डिटर्जंट वापरल्यास साडीची चमक कमी होते.