Gold Mangalsutra Designs : दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोला गिफ्ट काय द्यावे सुचेना? घ्या १ ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र, सगळे विचारतील घेतलं कुठून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2025 11:03 IST2025-10-17T18:01:19+5:302025-10-19T11:03:42+5:30

Gold mangalsutra designs : 1 gram gold mangalsutra: Diwali Padwa gift ideas: Mangalsutra for wife : यंदाच्या पाडव्याला बायकोला प्रेमाने काही गिफ्ट घ्यायचे असेल तर १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घेऊ शकता.

दिवाळी हा सण आनंदाचा- उत्साहाचा. प्रत्येकजण दिवाळी आनंदाने साजरी करतात. पहिल्या आंघोळनंतर दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेची अनेकजण वाटत पाहतात. नवीन लग्न झालेले जोडपे दिवाळी पाडव्याची आतुरतेने वाट पाहतात. (Gold mangalsutra designs)

यंदाच्या पाडव्याला बायकोला प्रेमाने काही गिफ्ट घ्यायचे असेल तर १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घेऊ शकता. पाहा लेटेस्ट पर्याय. (1 gram gold mangalsutra)

सध्या बाजारात साखळ्या, लहान पेडेंट आणि मणी असलेले डिझाइन सर्वात लोकप्रिय आहे. फुले आणि कुंदन डिझाइन देखील ट्रेडिंगमध्ये आहेत.

बाजारात अशा अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. जे फक्त १ ग्रॅम वजनात सुंदर आणि स्टायलिश दिसतात. जे वजनाने हलके असतात पण दिसायला अगदी सुंदर आहेत.

रोज वापरण्यासाठी आपण वाटी आणि काळ्या मण्यांचे डोरले घेऊ शकतो. यामध्ये पूर्णपणे सोन्याचे डिझाइन्स असेल.

सध्या सिंगल लेयर आणि डबल लेयर मंगळसूत्रांचा ट्रेंड आहे. यात डायमंड किंवा मणी असणारे मंगळसूत्र आपण घालू शकतो.

लहान हिऱ्यांनी जडवलेले सोन्याचे पेंडेंट खूपच सुंदर दिसतात. यात १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र देखील खूप छान दिसते.