स्तनांचा आकार मोठा असेल, तर ब्रेसियर घेताना करुन नका ६ चुका - 'अशी' ब्रा घालणे ठरेल फायद्याचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 13:45 IST2025-08-26T13:33:41+5:302025-08-26T13:45:34+5:30

best bra for heavy breast size : bra tips for big bust women : how to choose bra for heavy breast : स्तनांचा आकार मोठा असल्यामुळे योग्य ब्रेसियर निवडताना काही अडचणी येतात, त्यासाठीच खास टिप्स...

हेव्ही ब्रेस्ट साईज असणाऱ्या महिलांसाठी योग्य ब्रेसियर निवडणे (best bra for heavy breast size) खूप महत्त्वाचे असते. चुकीचा साईज किंवा चुकीच्या डिझाईनची ब्रेसियर वापरल्याने पाठीचा त्रास, खांद्यावर दबाव, चुकीचा बॉडी शेप आणि त्वचेला इजा होऊ शकते. म्हणून हेव्ही ब्रेस्ट असलेल्या महिलांनी ब्रेसियर खरेदी करताना काही खास (how to choose bra for heavy breast) गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

काही महिलांच्या स्तनांचा आकार मोठा असल्यामुळे योग्य ब्रेसियर (bra tips for big bust women) निवडताना काही अडचणी येतात. परंतु हेव्ही ब्रेस्ट असेल तर योग्य ब्रा निवडणं खूप गरजेचं आहे. यामुळे शरीराला चांगला आधार मिळतो आणि आपण दिवसभर सहज, न अवघडता आरामदायक पद्धतीने वावरु शकता.

मोठ्या स्तनांसाठी वाइड स्ट्रॅप्स असलेल्या ब्रा खूप चांगल्या असतात. त्या तुमच्या खांद्यांवरचा भार कमी करतात आणि तुम्हाला आरामदायक आणि कम्फर्टेबल लूक देतात. पातळ स्ट्रॅप्स असलेल्या ब्रेसियर तुमच्या खांद्यांना दुखवू शकतात.

हेव्ही ब्रेस्टसाठी ब्रेसियर खरेदी करताना, ती किती सपोर्ट देते हे नक्की तपासा. अंडरवायर किंवा फुल कव्हरेज असलेल्या ब्रा चांगला सपोर्ट देतात. मोठ्या स्तनांसाठी, फुल कव्हरेज ब्रा एक चांगला पर्याय आहे कारण ती स्तनांना पूर्णपणे झाकून ठेवते आणि योग्य आकार देते.

ब्रेसियरचे फॅब्रिक आरामदायक आणि आपली त्वचा श्वास घेऊ शकेल असं असावं. कॉटन, स्पॅन्डेक्स किंवा मायक्रोफायबर सारखे फॅब्रिक दिवसभर आरामदायक वाटतात.

शक्य असल्यास, हेव्ही ब्रेस्ट असलेल्या महिलांनी ब्रेसियर खरेदी करण्यापूर्वी ती घालून नक्की तपासा. यामुळे तुम्हाला ती किती आरामदायक आहे आणि ती व्यवस्थित बसते की नाही, हे कळेल.

स्तनांचा आकार मोठा किंवा खूपच हेव्ही ब्रेस्ट असेल तर चुकूनही फक्त १ किंवा २ हुक असलेली ब्रेसियर घेऊ नका. यामुळे स्तनांना योग्य सपोर्ट मिळणार नाही आणि स्तन ओघळल्यासारखे दिसतील. यासाठी हेव्ही ब्रेस्ट साईज असलेल्या महिलांनी नेहमी ३ किंवा त्यापेक्षा जास्त हुक असणाऱ्या ब्रेसियरची निवड करावी.

कमरेजवळील रुंद पट्टा वजन नीट सांभाळतो आणि पाठीवरील ताण कमी करतो. यामुळे ब्रेस्टला योग्य सपोर्ट मिळतो आणि अनकंफर्टेबल स्पिलिंग टाळता येते. यामुळे छातीला अतिरिक्त सपोर्ट मिळतो, पण आरामदायक असल्याची खात्री करा.