आंघोळ करताना महिलांनी वापरावेत 'हे' ८ 'मस्ट-हॅव' ब्यूटी टूल्स! त्वचा दिसेल सुंदर - छोटासा बदल पाडेल सौंदर्यात भर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 20:10 IST2026-01-09T22:00:00+5:302026-01-10T20:10:10+5:30
bathing essentials for women : best shower tools for healthy skin : bath tools to use while bathing आंघोळ करताना महिलांनी नक्की वापरायला हवेत असे खास स्किन केअर टूल्स आणि त्यांचे फायदे...

'आंघोळ' ही फक्त स्वच्छतेपुरतीच मर्यादित न ठेवता ती त्वचेची योग्य निगा (bathing essentials for men and women) राखण्यासाठी देखील गरजेची असते. रोजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये त्वचा कोरडी होणे, निस्तेज दिसणे किंवा रफ होणे अशा समस्या सतावतात. आंघोळ ही फक्त शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया नसून ती त्वचा हायड्रेट आणि टवटवीत ठेवण्याची एक खास प्रक्रिया असते. घाईघाईत आंघोळ करताना आपण अनेकदा त्वचेकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे त्वचा कोरडी किंवा निस्तेज पडू शकते.

आंघोळ करताना फक्त साबण किंवा बॉडी वॉश वापरून चालत नाही, तर त्वचेची (best shower tools for healthy skin) खोलवर स्वच्छता करण्यासाठी काही स्किन केअर टूल्स वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे टूल्स फक्त डेड स्किनचं काढत नाहीत, तर रक्ताभिसरण सुधारून त्वचेला नैसर्गिक चमक देतात.

आंघोळीदरम्यान योग्य ब्यूटी स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर केल्यास त्वचा मऊ, स्वच्छ आणि हेल्दी राहते. आंघोळ करताना त्वचेसाठी (bath tools to use while bathing) आवश्यक अशा काही योग्य टूल्सचा वापर केल्यास त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य खुलते. आंघोळ करताना महिलांनी नक्की वापरायला हवेत असे खास स्किन केअर टूल्स आणि त्यांचे फायदे काय ते पाहूयात.

१. सिलिकॉन स्क्रबर (Silicone Scrubber) :-
जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल, तर नायलॉनच्या लूफापेक्षा सिलिकॉन स्क्रबर हा उत्तम पर्याय आहे. हा त्वचेसाठी खूपच मऊ असतो आणि यावर बॅक्टेरिया लवकर जमा होत नाहीत. हा स्वच्छ करणे आणि वाळवणे सोपे असते. सिलिकॉन स्क्रबर आपली स्किन एक्सफॉलिएट करते. डेड स्किन काढून त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

२. फूट ब्रश (Foot Brush) :-
आंघोळीच्या वेळी पायांची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे आहे. फुट ब्रशचा वापर केल्यास टाचांच्या भेगा आणि काळेपणा कमी होतो.

३. प्युमिक स्टोन (Pumice Stone) :-
टाचांखालील आणि पायांच्या बाजूची कडक त्वचा किंवा हाताचे कोपरे यांवरील डेड स्किन काढण्यासाठी हे एक फायदेशीर असे टूल आहे. आंघोळीच्या कोमट पाण्यामुळे पायांची त्वचा मऊ झाली की प्युमिक स्टोनने घासल्यास टाचांना पडलेल्या भेगा कमी होतात आणि पाय मऊ होतात.

४. सिलिकॉन बॉडी बॅक स्क्रबर स्ट्रीप (Back Scrubber Strip) :-
दोन्ही बाजूंनी पकडता येणारी ही लांब पट्टी मुख्यता पाठीची स्वच्छता करण्यासाठी वापरली जाते. ज्यांना पाठीपर्यंत हात पोहोचवण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. पाठीची त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी याचा वापर करा.

५. लूफा (Loofah) :-
हा फारच कॉमन स्किन केअर टूल आहे बरेचदा आपल्या सगळ्यांच्याच घरात असा एखादा लूफा असतोच. बॉडी वॉशचा फेस चांगला येण्यासाठी आणि अंगावरील वरवरची धूळ स्वच्छ करण्यासाठी लूफा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेचे हलके एक्सफोलिएशन देखील होते. बॅक्टेरिया टाळण्यासाठी लूफा दर ३ महिन्यांनी बदलावा.

६. फेशियल क्लिन्सिंग ब्रश (Facial Cleansing Brush) :-
फक्त हाताने चेहरा धुण्यापेक्षा ब्रशचा वापर केल्याने त्वचेला मिळणारे फायदे अधिक खोलवर आणि चांगले असतात. हा एक लहान बॅटरीवर चालणारा किंवा मॅन्युअल ब्रश असतो, ज्याचे तंतू अत्यंत मऊ असतात. हे तंतू त्वचेच्या छिद्रांमधील घाण आणि तेल काढून टाकण्यास मदत करतात. ब्रशच्या मसाजमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

७. एक्सफोलिएटिंग ग्लोव्हज (Exfoliating Gloves) :-
एक्सफोलिएटिंग ग्लोव्हज हे हातमोज्यांसारखे असतात, जे तुम्ही हातात घालून अंगाला मसाज करू शकता. शरीराचे कोपर, गुडघे आणि घोट्यांसारख्या काळवंडलेल्या भागांची स्वच्छता करण्यासाठी हे खूप फायदेशीर टूल आहे.

८. बॉडी ब्रश (Body Brush - Dry/Wet Brushing) :-
लांब दांडा असलेला हा ब्रश पाठीसारख्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप उपयुक्त असतो. कोरड्या किंवा ओल्या त्वचेवर याचा वापर केल्याने 'लिम्फॅटिक ड्रेनेज' (विषारी घटक बाहेर टाकणे) सुधारते आणि सेल्युलाईट कमी होण्यास मदत होते. यामुळे पाठीवरील मुरुम कमी होण्यास मदत होते. बॉडी ब्रशने हलक्या हाताने मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि त्वचा अधिक हेल्दी दिसते.
















