शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळी सुरू असताना 'हे' पदार्थ खाणं टाळाच, पोटदुखीचा त्रास आणखी वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 14:20 IST

1 / 6
मासिक पाळी सुरू असताना पुढे सांगितलेले काही पदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. कारण या पदार्थांमुळे तुमची मासिक पाळीतली पोटदुखी जास्त वाढू शकते.
2 / 6
त्या पदार्थांपैकी पहिला पदार्थ म्हणजे थंड पाणी. थंड पाणी प्यायल्याने शरीरातली वात प्रकृती वाढते आणि त्यामुळे पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. या काळात तुम्हाला खूप जास्त पोटदुखीचा त्रास होत असेल तर कोमट पाणी पिणे चांगले.
3 / 6
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ मासिक पाळीच्या काळात टाळायला हवेत. कारण त्यामुळे कफ प्रकृती वाढते आणि पोटदुखीचा त्रास वाढू शकतो.
4 / 6
कॅफीनयुक्त पदार्थ म्हणजेच चहा आणि कॉफी यांचे देखील मासिक पाळीच्या काळात जास्त सेवन करू नये.
5 / 6
मांसाहार किंवा खूप जास्त तेलकट, तुपकट पदार्थही मासिक पाळीच्या काळात टाळायला हवेत.
6 / 6
त्याचप्रमाणे मैद्याचे वेगवेगळे पदार्थ खाणंही टाळा. कारण ते पचायला जड असतात. शिवाय या पदार्थांमुळे शरीरातला वात आणि कफ वाढतो. यामुळे पिरियड क्रॅम्प्स वाढू शकतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न