अनुष्का शर्मासारखी परफेक्ट 'फिगर' हवी? ती करते ‘तसा’ व्यायाम करा, बाळांतपणानंतर वाढलेलं वजनही झरझर उतरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 19:40 IST2025-03-25T17:54:28+5:302025-03-25T19:40:47+5:30
Anushka Sharma post-pregnancy fitness: Anushka Sharma's diet plan after pregnancy: Fitness tips for women after pregnancy: How to get fit after pregnancy like Anushka Sharma: Anushka Sharma pregnancy workout routine: Post-pregnancy fitness plan for women: Anushka Sharma fitness secrets for new moms: Diet and exercise for post-pregnancy weight loss: आई झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी आपली फिगर कायम नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक अनुष्का शर्मा.

बॉलीवूड अभिनेत्री असो किंवा अभिनेता स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अधिक मेहनत घेत असतात. त्यासाठी काही अभिनेत्री झिरो फिगर मिळवण्यासाठी आणि आयुष्यभर तरुण दिसण्यासाठी खूप मेहनत घेतात. (Anushka Sharma post-pregnancy fitness)
बॉलीवूड अभिनेत्रीला पाहून आपल्यालाही असे वाटते की, आपली देखील बॉडी अशीच असावी. आई झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी आपली फिगर कायम नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक अनुष्का शर्मा. (Anushka Sharma's diet plan after pregnancy)
दोन मुलांची आई झाल्यानंतर तिने लगेच आपले वजन कमी केले. याविषयी तिने मुलाखतीत देखील सांगितले आहे. आपल्यालाही बाळांतपणानंतर वजन कमी करायचे असेल तर आहार आणि फिटनेस रुटीन कसे असायला हवे पाहूया. (Fitness tips for women after pregnancy)
अनुष्का शर्मा वेगन पदार्थ खाते. तिच्या आहारात सोया दूध, बादामाचे दूध, हिरव्या भाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश असतो.
तिच्या आहारात गव्हाच्या चपातीऐवजी बाजरी, नाचणीच्या भाकरी असतात. तसेच आहारात ती उच्च प्रथिने असणारे पदार्थ खाते.
स्नायूंना चांगल्या प्रकारे टोन करण्यासाठी ती दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पिते. यामुळे ती स्वत:ला हायड्रेट देखील ठेवते. पाणी प्यायल्याने त्वचा देखील चमकदार होते.
अनुष्का शर्मा फ्रिटनेस फ्रीक आहे ती स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करते. योगा, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, मेडिटेशन सारखे वर्कआऊट करते. गरोदर असताना देखील तिने काही हलके व्यायाम केले आहेत.
तिला डान्सची अधिक आवड असल्याने तो सुद्धा करते. यामुळे कॅलरीज अधिक प्रमाणात बर्न होतात. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करुन पाहा.