निळ्या काठांची पांढरी साडी; फॅशनपलिकडे जाणारं सन्मानाचं-आदराचं प्रतीक! निवडा साधेपणातलं सामर्थ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:52 IST2026-04-13T15:00:11+5:302026-04-13T15:52:47+5:30

Ambedkar Jayanti 2026 Special White Saree (Bhim Jayanti 2026) : उन्हाळ्यात कॉटन, लिनन किंवा खादीच्या साड्या जास्त सोयीच्या.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti 2026) म्हणजेच १४ एप्रिल. त्यादिवशी बाबासाहेबांना वंदन करण्याच्या कार्यक्रमासाठी निळ्या काठांची पांढरी साडी तरुणी-महिला नेसतात. मोठ्या मायेनं एकमेकींसाठीही साड्या घेतल्या जातात. (Bhim Jayanti Special White And Blue Saree)

पांढरा रंग हा पावित्र्य, शांतता, समानता आणि औदार्याचं प्रतीक. निळा रंगही अथांगतेची महती सांगतो. (Ambedkar Jayanti 2026)

त्या रंगाची साडी मनालाही प्रसन्नता देते आणि जाणीवही करुन देते महिलांना मिळालेल्या हक्क आणि अधिकारांची. (White And Blue Saree For Bhim Jayanti)

कॉटन किंवा लिननची सुती साडी, सिल्क किंवा पैठणीच्या प्रकारतही पांढरी साडी आणि निळी बॉर्डर असे सुंदर पर्याय आता उपलब्ध आहेत.

उन्हाळ्यात कॉटन, लिनन किंवा खादीच्या साड्या जास्त सोयीच्या. दिसतातही अगदी साध्या पण एलिगंट. साधेपणातलं समानततेचं हे रुप दिसतंही सुंदर.

अर्थात साडी, पोषाख हे प्रतीक झालं. त्यापलिकडे सन्मानानं जगण्याची लढाई आणि लोकशाहीतली आपली कर्तव्यही साऱ्यांसाठी महत्वाची आहेत.

बॉर्डरसाठी तुम्ही रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू किंवा स्काय ब्लू अशा आवडीच्या शेड्स निवडू शकता. सध्या इंडीगो प्रिंट असेल्या निळ्या बॉर्डरची खूप फॅशन आहे

शिक्षण-संघर्ष-न्याय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं ही शिकवण आपण कधीही विसरता कामा नये. महिलांसाठी तर ती लाखमोलाची!