प्रत्येकीकडे असायलाच हव्यात अशा ८ 'ब्रेसियर ॲक्सेसरीज,' ब्रा वापरताना होणाऱ्या अडचणी होतील कमी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 18:36 IST2024-12-16T18:24:06+5:302024-12-16T18:36:15+5:30
8 Must Have Bra Accessories Every Girl Should Have : 8 Bra Accessories For Comfort : What Is Bra Accessories What Are The Benefits Of Using It : 8 Types of Bra Accessories Women Should Have : तुमच्याकडे आहेत का या बेसिक ८ 'ब्रेसियर ॲक्सेसरीज' ?

महिलांच्या रोजच्या वापरातील सगळ्यात (8 Bra Accessories For Comfort) महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची 'ब्रेसियर'. या ब्रेसियर खरेदी केल्यानंतर त्या वापरत असताना काहीवेळा अनेक अडचणी येतात. कधी साइज चुकते, कधी ती फारच मोठी होते, किंवा कधी ब्रेसियरच्या पट्ट्यांबाबतसुद्धा आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. मात्र आता त्यासाठी (8 Types of Bra Accessories Women Should Have) अनेक प्रकारच्या ब्रेसियर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेसियर ॲक्सेसरीज म्हणजे नक्की काय असतं आणि ते वापरण्याचे आरोग्यदायी फायदे काय ते पाहूयात.
१. लो बॅक कनव्हर्टर :-
जर बॅकलेस ड्रेस घालायचा असेल आणि तुमचा ड्रेस पॅडेड नसेल तर लो बॅक कनव्हर्टरचा वापर करू शकता. लो बॅक कनव्हर्टर ब्रेसियरला मागच्या बाजूने २ एक्स्ट्रा पट्ट्या ऍड करून ब्रेसियरची मागची बाजू हवी तशी सेट करू शकता.
२. डबल साइडेड टेप :-
ब्रेसियरची पट्टी सारखी खांद्यावरून घसरून ड्रेसच्या स्लीव्जमधून बाहेर डोकावत असेल तर डबल साइडेड टेपचा वापर करू शकता. डबल साइडेड टेपचा वापर करून ब्रेसियरची पट्टी ड्रेसच्या स्लिव्हजला चिटकवू शकता.
३. ब्रा स्ट्रिप एक्सटेंडर :-
जर कधी चुकीच्या साइजची ब्रेसियर विकत घेतली किंवा ब्रेसियरची साइज लहान झाली तर ब्रा स्ट्रिप एक्सटेंडर वापरून ब्रेसियरची साइज वाढवता येते.
४. रेसर ब्रा कन्व्हर्टर :-
रेसर ब्रा कन्व्हर्टर वापरल्याने नेहमीच्या ब्राला हटके व स्टायलिश बॅक देऊ शकता. जर ब्रा स्ट्रीप खांद्यावरून सारखी खाली घसरत असेल तर ते ही बंद होईल.
५. ट्रान्सपरंट ब्रा स्ट्रीप :-
जर आपण ऑफशोल्डर किंवा त्या प्रकारचे ड्रेस घालणार असाल किंवा असे ड्रेस ज्यातून आपली ब्रेसियर स्ट्रिप दिसणार असेल अशावेळी अशा ट्रान्सपरंट ब्रा स्ट्रीपचा आपण वापर करु शकता. या ट्रान्सपरंट ब्रा स्ट्रीप आपल्या ब्रा ला अगदी सहजपणे लावता किंवा काढता येतात.
६. निप्पल कव्हर :-
जर आपण कॉटनच्या नॉन-पॅडेड ब्रा वापरत असाल किंवा काही कपड्यांतून निपल्स दिसतात. अशावेळी आपण या निप्पल कव्हर्सचा वापर करु शकतो. यामुळे आपले निप्पल्स कव्हर केले जातात.
७. रॅबिट पूल अप स्टिक ऑन ब्रा :-
जर आपले स्तन ओघळलेले असतील असतील तर अशा स्तनांना पूल अप म्हणजे वरच्या दिशेने ओढून स्तनांचा शेप योग्य दिसावा यासाठी रॅबिट पूल अप स्टिक ऑन ब्रा चा वापर केला जातो. याचा वापर केल्याने आपले स्तन ओघळलेले दिसत नाहीत.
८. बॅकलेस ब्रा :-
जर तुमच्या ड्रेस हा बॅकलेस असेल मागचा गळा फारच डिप असेल तर अशावेळी मागून ब्रेसीयरची पट्टी दिसू नये म्हणून बॅकलेस ब्रा चा वापर केला जातो. या ब्रेसीयरच्या मागच्या बाजूला ट्रान्सपरंट पट्टी असते. ही ब्रेसियरची मागची पट्टी ट्रान्सपरंट असल्याने ती बॅकलेस ड्रेसमधून दिसत नाही.