७ सुपरस्मार्ट सुपरस्मार्ट किचन टिप्स- स्वयंपाक होईल झटपट! पसारा न करता स्वयंपाक करण्याचं पाहा सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2024 18:27 IST2024-05-03T09:21:37+5:302024-05-03T18:27:16+5:30

तुमचं स्वयंपाक घरातलं काम एकदम सोपं आणि झटपट व्हावं असं वाटत असेल तर या काही सवयी स्वत:ला लावून घ्या. या काही सुपरस्मार्ट किचन टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते. त्यामुळे सुरीवर लिंबू चोळा आणि मग भेंडी कापा. चिकटपणा जाणवणार नाही.

शेंगदाण्यांना बऱ्याचदा अळ्या लागतात. त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा. खूप दिवस चांगले राहतील.

रव्याचेही तसेच करा. रव्यामध्ये लवकर अळ्या पडतात. त्यामुळे रवा एकतर थोडा भाजून घ्या किंवा मग फ्रिजमध्ये ठेवून द्या.

तिखटात जाळं होऊ नये म्हणून त्यात एका बाजुला थोडं मीठ टाकून ठेवा.

कडधान्यांमध्ये भुंगे होतात. असं होऊ नये म्हणून त्यांच्यात तेजपान टाकून ठेवा.

तिखटमीठाचा डबा उघडताना, बंद करताना त्याला सारखे खरकटे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो. त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो डब्याचं झाकण लावूच नका.

स्वयंपाकाला सुरुवात करण्यापुर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरवून टाका. यामुळे सगळं त्या कागदवर सांडतं. ओटा खराब होत नाही, त्यामुळे तो स्वच्छ करण्यात खूप वेळ जात नाही.