बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी ७ सवयी सोडा! चुकीच्या गोष्टींमुळे मेंदू होतो कमकुवत- वाढतो विसरभोळेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 19:00 IST2026-04-01T19:00:00+5:302026-04-01T19:00:02+5:30

Mental health and brain sharp tips: How to keep your brain young and healthy: मेंदूला पोखरणाऱ्या ७ घाणेरड्या सवयी कोणत्या पाहूया.

आपल्या शरीराचा कंट्रोल म्हणजे आपला मेंदू. विचार करण्यापासून इतर गोष्टी आठवण्यापर्यंत या सर्व क्रिया मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जातात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण नकळत अशा काही सवयी लावून घेतो, ज्याचा आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जेव्हा आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी विसरायला होतात, एकाग्रता कमी होते किंवा सतत चिडचिड होते, तेव्हा समजून जा की तुमचा मेंदू थकलेला आहे आणि तो तुम्हाला धोक्याचा इशारा देत आहे.(Mental health and brain sharp tips)

आपली बुद्धी तल्लख आणि स्मरणशक्ती तेज ठेवायची असेल, तर केवळ बदाम खाऊन उपयोग नाही. त्याआधी मेंदूला पोखरणाऱ्या ७ घाणेरड्या सवयी सोडणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या सवयी आपण सोडायला हव्या पाहूया.(How to keep your brain young and healthy)

मेंदूला दिवसभरातील माहिती प्रोसेस करण्यासाठी आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी ७ ते ८ तासांच्या शांत झोपेची गरज असते. झोप पूर्ण न झाल्यास मेंदूवर ताण येतो आणि विसरभोळेपणा वाढतो.

रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी मेंदूला ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते. नाश्ता न केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मेंदूला पुरेसे पोषक घटक न मिळाल्यास बुद्धी मंदावते.

जास्त गोड पदार्थांमुळे शरीरातील प्रोटिन्स आणि पोषक तत्वांचे शोषण थांबते. यामुळे मेंदूच्या विकासात अडथळे येतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता कमी होते.

दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन कमी होतो. नियमित व्यायामामुळे एंडोर्फिन सारखी संप्रेरके स्त्रवतात, जी मेंदूला तरुण ठेवतात.

अति मद्यपान मेंदूला हानिकारक ठरु शकते. यात असणारे घटक न्यूरॉन्सवर परिणाम करतात. ज्यामुळे विचार करण्याची, समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमकुवत होते. यामुळे मानसिक आजारांचा धोका वाढतो.

सतत तणाव अनुभवणे हे मेंदूसाठी देखील हानिकारक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली असते, तेव्हा शरीरातील कॉर्टिसोल या हार्मोनचे प्रमाण वाढते. हा हार्मोन मेंदूच्या स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित भागावर परिणाम करतो, ज्यामुळे मानसिक थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो.

सतत स्क्रीन पाहिल्यामुळे मेंदूची एकाग्रता कमी होत जाते. यामुळे मेंदू लवकर थकतो आणि कामात चुका होण्याची शक्यता वाढते.