माऊथ कॅन्सरची सुरुवातीची ७ लक्षणं; सतत तोंड येतं म्हणत दुर्लक्ष करणंही पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:54 IST2026-04-06T12:47:05+5:302026-04-06T14:54:10+5:30

7 Early signs of mouth cancer : तोंडात किंवा जिभेवर सतत वेदना होणं किंवा तोंडाचा एखादा भाग बधीर झाल्यासारखा वाटणं.

तोंडाचा कॅन्सर (Mouth cancer) ही एक गंभीर समस्या असून पण योग्यवेळी लक्षणं ओळखल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येऊ शकतात. तोंडाच्या कॅन्सरची सुरूवातीच लक्षणं समजून घेऊ. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेंटल आणि क्रॅनिओ फेशियल रिसर्च यांच्या संशोधनावर आधारीत ही माहिती आहे. (7 Signs Of Mouth Cancer)

जीभ, हिरड्या आणि गालाच्या बाजूला पांढरे किंवा गडद लाल रंगाचे चट्टे दिसणं हे चट्टे घासले तरी निघत नाहीत.

हे सर्वात सामान्य लक्षण आहे. सामान्य तोंड येणं हे १० ते १५ दिवसांत बरं होतं. जर जखमेच्या कडा कडक असतील आणि तिला स्पर्श केल्यावर रक्त येत असेल तर ते मेलिग्नन्सीचे लक्षण असू शकते.

भारतीय उपखंडात सुपारी आणि तंबाखूमुळे हे प्रमाण जास्त आहे. तोंड उघडण्याच्या क्षमतेत घट होते. जबडा हलवताना त्रास होणं किंवा पूर्वीच्या तुलनेत कमी तोंड उघडण्याचा त्रासा होतो.

तोंडात, जिभेवर किंवा घशामध्ये कोणतीही नवीन गाठ जाणवणं किंवा तिथली त्वचा जाड होणं कधीकधी मानेच्या भागातही गाठ येऊ शकते.

अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणं, घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं किंवा गिळताना वेदना होणं.

जर तुमच्या आवाजात अचानक घोगरेपणा आला असेल किंवा बोलताना त्रास होत असेल आणि लक्षण बराचवेळ टिकून असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

कोणत्याही कारणाशिवाय किंवा हिरड्यांच्या आजाराशिवाय दात अचानक सैल होणं किंवा दाट काढलेल्या जागी जखम लवकर न भरणं