By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 20:47 IST
1 / 8महागड्या पार्लर ट्रिटमेंटवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही घरच्याघरी पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. तुमचे पैसे वाचवणारे ६ सोपे ब्युटी हॅक्स पाहूया. (Natural Beaty Secrets To Save Your Money)2 / 8 पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करण्याऐवजी मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लाव. मध त्वचेला मॉईश्चराईझ करण्यास मदत करेल. (7 Budget Friendly Beauty Hacks To Save Saloon Money)3 / 8 बाजारातील महागड्या स्क्रबपेक्षा कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून स्क्रब तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावरील आणि शरीरावरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचा मऊ करते.4 / 8डोळ्यांखालील काळी वर्तुळं काढून टाकण्यासाठी आय-क्रिमवर खर्च करण्याची गरच नाही. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स थंड करून डोळ्यांवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. यातील कॅफेनमुळे सूज आणि काळी वर्तुळ कमी होतील.5 / 8केसांना चमक आणण्यासाठी पार्लरमध्ये हेअर स्पा करण्याऐवजी दही आणि कोरफड जेल एकत्र करून केसांनालावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केस रेशमी होतात आणि कोंड्याची समस्याही कमी होते.6 / 8 ओठ गुलाबी आणि मऊ ठेवण्यासाठी साखर आणि मध एकत्र करून ओठांवर हलक्या हाताने चोळ. यामुळे ओठांवरील काळेपणा निघून जातो आणि ओठ नैसर्गिकरित्या मऊ होतात.7 / 8 मेनिक्युअरचा खर्च वाचवण्यासाठी लिंबाचा रस काढल्यानंतर त्याची सालं नखांवर घासल्यानं नखांचा पिवळेपणा दूर होतो आणि नखं चमकू लागतात.8 / 8पार्लरमध्ये महागडे टोनर वापरण्याऐवजी काकडीचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील उघडी छिद्र बंद होतात आणि त्वचा दिवसभर हायड्रेट राहते.