शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जास्वंदाचे फुल वापरण्याच्या ५ योग्य पद्धती, केस - त्वचा - आरोग्य सगळंच राहील मस्त , घरगुती औषध ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 14:58 IST

1 / 6
जास्वंदाचे फुल हे केवळ वाहण्यासाठी किंवा सजावटीसाठी नसून आरोग्य आणि सौंदर्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदातही याला विशेष महत्त्व आहे. योग्य पद्धतीने वापर केल्यास जास्वंदाचे फुल केस, त्वचा आणि शरीराच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकते.
2 / 6
जास्वंदाचा चहा(Hibiscus tea) हा त्यातील एक सोपा आणि प्रभावी उपयोग आहे. सुकवलेल्या जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेला चहा शरीराला थंडावा देतो, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि पचन सुधारतो. विशेषतः उन्हाळ्यात हा चहा पिणे फायदेशीर ठरते.
3 / 6
केसांसाठी जास्वंदाचे पाणी खूप उपयोगी ठरते. जास्वंदाची फुले पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर केसांना लावल्यास केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात. तसेच केसगळती कमी करण्यासही मदत होते. नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही हे पाणी काम करते.
4 / 6
जास्वंदाची पूड तयार करुनही अनेक प्रकारे वापरता येते. सुकवलेली फुले बारीक करून पूड बनवली तर ती केसांसाठी पॅक म्हणून वापरता येते. ही पूड दही किंवा पाण्यासोबत मिसळून केसांना लावल्यास केसांना पोषण मिळते आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.
5 / 6
त्वचेसाठीही जास्वंद फायदेशीर आहे. जास्वंदाची पेस्ट किंवा पूड फेसपॅक म्हणून वापरल्यास त्वचा तजेलदार दिसते, मुरुम कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. यात असलेले अँटी ऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवतात.
6 / 6
याशिवाय जास्वंदाचे तेलही बनवता येते. खोबरेल तेलात जास्वंदाची फुले उकळून तयार केलेले तेल केसांच्या वाढीसाठी आणि टाळूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. एकूणच, जास्वंदाचे फुल हे नैसर्गिक आणि बहुगुणी औषध आहे.
टॅग्स :Home remedyहोम रेमेडीHealth Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजीFlowerफुलं