1 / 7उन्हाचा पारा वाढला की जीव अगदी नकोसा होऊन जातो. सतत पाणी प्यावं वाटतं. त्यामुळे मग पोट फुगल्यासारखं होतं. जेवण नकोसं वाटतं. असं झालं की मग आपोआपच डिहायड्रेशनचा त्रास होतो. गळून गेल्यासारखं होतं.2 / 7काही जणांना ऊन वाढल्यावर उन्हाळी लागण्याचा त्रास होतो. डोळ्यांची, तळपायाची जळजळ होते. शरीरातली उष्णता वाढली की हे सगळे त्रास सुरू होतात. असे त्रास सुरू झाल्यास काय खायला हवं जेणेकरून शरीर थंड राहण्यास मदत होऊ शकते, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी garbhaostavpathway या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 7त्यापैकी पहिला उपाय म्हणजे सकाळच्या वेळी १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा सब्जा घालून पाणी प्या. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते.4 / 7दुपारच्या जेवणात १ ग्लास ताक अवश्य घ्या. ताकामुळे डिहायड्रेशन होत नाही. अन्नपचनही चांगले होते.5 / 7दुपारी ४ ते ५ वाजता चहा, कॉफी असे गरमागरम पदार्थ घेण्याऐवजी कैरीचं पन्हं, कोकम सरबत किंवा मग लिंबू सरबत प्या. बरं वाटेल. 6 / 7रात्री झोपण्यापुर्वी गरम दुधामध्ये तूप घालून प्यायल्यानेही शरीराला बऱ्यापैकी बरं वाटतं...7 / 7याशिवाय आठवड्यातून दोन वेळा नारळपाणी प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलेंस राहातो आणि डिहायड्रेशन होत नाही.