शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री किचनमध्ये खूप बारीक झुरळं होतात? ५ छोटी रोपं घरात ठेवा; झुरळं आसपासही दिसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 3:57 PM

1 / 6
प्रत्येकाच्याच घरात झुरळं आणि त्याच्या बारीक बारीक पिल्लांनी धुमाकूळ घातलेला असतो. (How to Remove Cockroaches From House) घरात झुरळांचा अतिरेक झाल्यास अन्न प्रदूषित होते ज्यामुळे फूड पॉइजनिंगचाही धोका असतो. घराच्या आजूबाजूला किंवा घरात काही इन्डोअर प्लांट ठेवले तर झुरळं तयार होणार नाहीत.
2 / 6
पुदिन्याचा सुंगध किटकांना आवडत नाही. ज्यामुळे झुरळं घरात प्रवेश करत नाहीत. घरात पुदिन्याचे रोप ठेवा, जेणेकरून याच्या वासाने झुरळं घरात येणार नाहीत.
3 / 6
रोजमेरी प्लांट झुरळांना दूर ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. रोजमेरीच्या पानांच्या तीव्र वासाने झुरळं घरापासून लांब राहण्यास मदत होते. याशिवाय इतर किटकही येत नाहीत.
4 / 6
या रोपाच्या वासाने झुरळांना दूर पळवण्यास मदत होते. कॅटनीप प्लांटमुळे झुरळं जास्त प्रमाणात घरात येत नाहीत.
5 / 6
लेमनग्रास वनस्पतीच्या ताज्या आणि वाळवलेल्या दोन्ही पानांना एक तीव्र चव आहे. झुरळांना हा स्मेल सहन होत नाही म्हणून हे झाड झुरळांना पळवण्यासाठी उत्तम ठरते.
6 / 6
लसूण घराच्या गार्डनमध्ये किंवा अंगणात लावल्यास लसणाच्या तीव्र वासाने झुरळांबरोबरच इतर किटकही घरापासून दूर राहतात.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया