५ आयुर्वेदिक नियमांप्रमाणे करा दिवसाची सुरुवात, आयुष्यच बदलेल! शंभर वर्षे जगाल निरोगी आणि आनंदात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:29 IST
1 / 6Ayurvedic Morning Routine: आयुर्वेद आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. कारण आयुर्वेदात रोजच्या जगण्यासंबंधी आणि आरोग्यासंबंधी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. म्हणूनच आयुर्वेदाला आरोग्याचा खजिना मानलं जातं. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, शरीराच्या नॅचरल रिदमला मेंटेन करण्यासाठी सकाळी काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. हे नियम पाळले गेले तर दिवसभर तुम्हाला एनर्जी मिळेल, तुम्ही सकारात्मक रहाल आणि तुमची तब्येतही अनेक वर्ष टणटणीत राहणार.2 / 6आयुर्वेदानुसार, सकाळी शरीरातून विषारी तत्व बाहेर काढले पाहिजेत. यासाठी सगळ्यात आधी ब्रश करावा, त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावं आणि त्यानंतर टॉयलेटला जावं. यानं पोट साफ होण्यास मदत मिळेल. प्रयत्न करा की, टॉयलेट जाण्याची तुमची रोजची वेळ एकच असावी.3 / 6आयुर्वेदानुसार, सकाळी दात स्वच्छ करण्यासोबतच जिभही स्वच्छ करणं गरजेचं असतं. यासाठी हळूहळू जिभ ब्रशच्या मदतीनं किंवा बोटांच्या मदतीनं घासा. यानं इंटरनल ऑर्गन चांगले राहतात आणि सोबतच डायजेशन सिस्टीमही चांगली राहते. असं केल्यानं जिभेवरील मृत पेशीही निघून जातात.4 / 6आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, सकाळी डोक्याची हलकी मालिश करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यानं डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढून तुमचा स्ट्रेस कमी होईल. तसेच केसांसंबंधी अनेक समस्याही दूर होतील. असं म्हटलं जातं की, गरम तेलानं डोक्याची मालिश केल्यानं डोकेदुखी, टक्कल पडणे, केसगळती या समस्या दूर होण्यास मदत मिळते. 5 / 6आयुर्वेदात एक्सरसाईजला सुद्धा खूप महत्व आहे. खासकरून रोज योगाभ्यास करण्याला प्राधान्य दिलं जातं. कारण योगा करून शरीराच्या सगळ्या मसल्स अॅक्टिव होतात. आयुर्वेदानुसार, रोज सकाळी सूर्य नमस्कार करून दिवसाची सुरूवात करावी. यानं पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि दिवसभर एनर्जी सुद्धा मिळते.6 / 6सकाळी झोपेतून लवकर उठून मोठा श्वास घ्या आणि काही वेळ ध्यान लावून बसा. यानं तुमच्या मनातील नकारात्मक विचार बाहेर येतील. तसेच विचारांवर कंट्रोल करण्यास मदत मिळेल. तसेच श्वासासंबंधी अनेक समस्याही दूर होतील.