शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रात्री पाय ओढल्यासारखे होतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? ५ पदार्थ खा- हात, पाय दुखणं थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 17:07 IST

1 / 6
बऱ्याच जणींना रात्री अंथरुणावर पडताच पाय दुखण्याचा खूप त्रास होतो. पाय ओढल्यासारखे वाटतात. पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. हात- पाय दुखायला लागतात. हा त्रास होत असेल तर काही पदार्थ आपल्या आहारात अगदी रोजच्या रोज असायला हवेत.
2 / 6
ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी getfitwith_drchetana या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यातला पहिला पदार्थ आहे केळी. केळीमधून पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो. त्यामुळे रोज १ केळ खायलाच हवं.
3 / 6
नारळपाणी पिणं देखील फायद्याचं होतं. उन्हाळ्यात किंवा एरवीही शरीरातलं पाणी आणि क्षार कमी झाल्याने पाय दुखतात. नारळपाण्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियम चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स राहातो आणि पायदुखीचा त्रास कमी होतो.
4 / 6
बदाम आणि खजूर देखील खा. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असतं. तर खजुरामध्ये पोटॅशियम असतं. हे दोन्ही पदार्थ रोज खाल्ले तर शरीराला पुरेशी उर्जा मिळते आणि पोटऱ्यांमध्ये येणारे गोळे कमी होण्यास नक्कीच मदत होते. २ खजूर आणि २ बदाम नियमितपणे खा असं डॉक्टर सांगतात.
5 / 6
तीळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असल्याने ते हाडांसोबतच स्नायूंच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत. शिवाय तीळ हे वातशमन करणारे आहेत. शरीरातला वात कमी झाला की आपोआप पाय दुखणं कमी होतं.
6 / 6
दूध आणि ताक यासारखे पदार्थही आपल्या आहारात रोजच असायला हवे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नBananaकेळीHome remedyहोम रेमेडी