Navratri 2025: ९ दिवसांचे उपवास करताय? ५ पेयं नक्की प्या, थकवा- अशक्तपणा जाणवणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 16:30 IST2025-09-23T15:39:54+5:302025-09-23T16:30:33+5:30
Navratri 2025 Special Fast Energy Drinks: नवरात्रीचे उपवास अनेक घरांमध्ये केले जातात. ९ दिवस उपवास करताना सुरुवातीला उत्साह असतो, त्यामुळे थकवा जाणवत नाही. पण हळूहळू तेलकट, तुपकट पदार्थांचे आहारातले प्रमाण वाढते आणि त्यामुळे मग एनर्जी लेव्हल कमी व्हायला लागते.

नवरात्रीचे उपवास अनेक घरांमध्ये केले जातात (Navratri 2025). घटस्थापनेपासून उपवासाला सुरुवात होते आणि ते उपवास नवमीच्या दिवशी सुटतात.
९ दिवस उपवास करताना सुरुवातीला उत्साह असतो, त्यामुळे थकवा जाणवत नाही. पण हळूहळू साबुदाणा, बटाटा अशा स्टार्चयुक्त पदार्थांचे तसेच तेलकट, तुपकट पदार्थांचे आहारातले प्रमाण वाढते आणि त्यामुळे मग एनर्जी लेव्हल कमी कमी व्हायला लागते.
म्हणूनच उपवासाचा थकवा येऊ द्यायचा नसेल तर उपवासाच्या नऊ दिवसांत यापैकी काही पदार्थ रोज प्या. या पदार्थांमुळे अंगात एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल.(5 energy drinks for Navratri fast)
सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे ताक. मीठ किंवा थोडीशी साखर घातलेलं ताक उपवासात नक्की प्या. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. तसेच ताकामुळे ॲसिडीटीही होत नाही.(best sharbat for quick energy in Navratri vrat)
दुसरा पदार्थ म्हणजे नारळपाणी. नारळपाणी प्यायल्याने लगेचच एनर्जी येते. थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.
तिसरा पदार्थ आहे सुकामेव्याचा मिल्कशेक. सुकामेवा १ ते २ तास दुधामध्ये भिजत घाला आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याचा मिल्क शेक करा. पोटासाठी हा मिल्कशेक अतिशय दमदार राहातो. तो प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही.
मखाना खीर एक दिवसाआड तरी नक्की खा. कारण तिच्यातून भरपूर पोषण मिळतं. शिवाय पचायलाही ती सोपी असते.
लिंबू सरबत हा देखील उपवासासाठी एक अत्यंत चांगला पदार्थ आहे. जेव्हा जेव्हा थकवा, अशक्तपणा जाणवू लागेल तेव्हा लगेच लिंबू सरबत करून प्या. भरपूर