शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अपचनाचा त्रास नेहमीच होतो- गॅसेस होऊन पोट फुगतं? पुजा माखिजा सांगतात ३ सोपे उपाय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2023 15:19 IST

1 / 6
काही जणांना खाण्यापिण्यात थोडा जरी बदल झाला तरी तो अजिबात सहन होत नाही. लगेच अपचनाचा त्रास होतो.
2 / 6
काही जणांना पोट फुगल्यासारखं, गच्च झाल्यासारखं वाटतं. गॅसेसचा त्रास होतो. असा त्रास होत असेल तर नेमका काय उपाय करावा, याविषयीची माहिती सेलिब्रिटी डाएटिशियन पुजा माखिजा यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
3 / 6
पुजा माखिजा सांगतात की अपचनाचा त्रास वारंवार होत असेल तर अशा व्यक्तींनी खाण्यापिण्याची काही पथ्यं पाळली पाहिजेत. ती कशा पद्धतीने पाळायची याचे काही साधे- सोपे उपाय त्यांनी सांगितले आहेत.
4 / 6
अपचनाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रिकाम्यापोटी कच्च्या भाज्या किंवा सलाड खाणं टाळावं. कारण त्यामध्ये असणारे insoluble fiber पोटामध्ये गॅस तयार करणारे बॅड बॅक्टेरिया निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.
5 / 6
आल्याचं किंवा ओल्या हळदीचं लिंबाचा रस घालून लोणचं तयार करून ठेवावं. हे लोणचं १ टीस्पून या प्रमाणात घेऊन दररोज दुपारी आणि रात्री जेवणात तोंडी लावावं. यामुळेही पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.
6 / 6
ओवा, मेथी दाणे, जीरे, मीरे हे सगळे पदार्थ सम प्रमाणात घेऊन भाजावेत. त्याची पावडर करून ठेवली तरी चालेल. रोज रात्री झोपण्यापुर्वी एक चुटकीभर पावडर पाण्यासोबत घ्यावी.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स