मोदकांचे हे १० प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? पाहा आणि तुमच्या आवडीचा मोदक लगेच खा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 20:20 IST2025-03-02T16:41:15+5:302025-03-02T20:20:51+5:30
10 Types Of Modak - Colorful And Delicious : मोदकांचे हे १० प्रकार तुम्हाला माहिती आहेत का ?

महाराष्ट्रामध्ये घरोघरी गोड पदार्थ म्हणून मोदक तयार केले जातात. पण मोदकाचेही अनेक प्रकार आहेत. ते प्रकार जाणून घेऊया.
१. उकडीचे मोदक
आपल्या बाप्पाच्या आवडीचे पक्वान्न म्हणजे मोदक. उकडीचे मोदक आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करतो. तयार करायला फार किचकट आहेत पण, चव मात्र पैसा वसूल असते.
२. तळलेले मोदक
तळलेले मोदकही वर्षानुवर्षे घरोघरी तयार केले जात आहेत. संकष्टीच्या दिवशी अनेक जण तळणीचे मोदक तयार करतात.
३. चॉकलेटचे मोदक
आता पारंपारिक पदार्थांनाही थोड्या हटके पद्धतीने तयार केले जाते. तसेच मोदकाचे फ्यूजन प्रकार आहेत. चॉकलेटच्या फ्लेवरचे मोदक आजकाल लोकांना फार आवडतात.
४. काजूचे मोदक
प्रसादाला वगैरे आपण बरेचदा काजूचे मोदक वापरतो. लहानसा असतो. चवीला फारच छान लागतो. माघी गणपतीला प्रसादासाठी बरेचदा वापरला जातो.
५. गुलकंद मोदक
गुलकंद हा पदार्थ मुळातच फार चविष्ट लागतो. त्यात त्याचे मोदक म्हणजे एकच नंबर कॉम्बीनेशन आहे. असे मोदक दिसायलाही छान गुलाबी दिसतात.
६. मावा मोदक
मावा बर्फी, मावा पेढा तसेच माव्याचा मोदकही मिळतो. घरी तयार करायलाही सोपाच आहे. चवीला बऱ्यापैकी पेढ्यासारखाच लागतो. आत मध्ये मस्त सुकामेवा भरलेला असतो.
७. उकडीचा गुलाबी मोदक
गुलाबाचा अर्क उकड तयार करताना घालून हा मोदक तयार केला जातो. उकडीच्या साध्या मोदकासारखाच तयार करायचा फक्त थोडी पद्धत वेगळी असते.
८. पान मोदक
सध्या एक हटके असा मोदकाचा प्रकार आहे तो म्हणजे पान मोदक. पानाच्या चवीचा मोदक तयार केला जातो. त्याच्या आत सारणही भरले जाते. दिसायला ही हिरवा असतो.
९. गव्हाचे मोदक
तांदळाच्या पीठाऐवजी कणीक वापरूनही मोदक तयार केले जातात. बाकी पद्धत अगदी सारखीच. पण चवीत मात्र फरक पडतो.
१०. आंबा मोदक
मिनी आंबा मोदक लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही फार आवडतो. मे महिन्यामध्ये ताज्या आंब्याच्या रसापासून घरीच तयार करता येतो. तसेच स्वीटमार्टलाही मिळतो.