Valentine's Week 2026 List: उद्यापासून गुलाबी प्रेमाचा आठवडा सुरू होतोय! 'रोझ डे' ते 'वैलेंटाइन डे' कोणत्या दिवशी काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:46 IST2026-02-06T13:38:36+5:302026-02-06T13:46:34+5:30
Valentine's Week 2026 Full Schedule: ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकची संपूर्ण यादी. रोज डे, प्रपोज डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंतचे सर्व तपशील मराठीत वाचा.

फेब्रुवारी महिना सुरू झाला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे 'व्हॅलेंटाईन वीक'चे. प्रेमाची कबुली देण्यासाठी आणि जोडीदाराला खास वाटण्यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा आठवडा १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. तुम्हीही तुमच्या खास व्यक्तीला सरप्राईज देणार असाल, तर 'व्हॅलेंटाईन वीक २०२६' चे पूर्ण कॅलेंडर नक्की जाणून घ्या.

व्हॅलेंटाईन वीक २०२६ पूर्ण यादी (Valentine's Week 2026 Calendar):
७ फेब्रुवारी - रोझ डे (Rose Day) - प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात गुलाबाने होते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लाल, पिवळे किंवा गुलाबी गुलाब देऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

Propose Day:
८ फेब्रुवारी - प्रपोज डे : जर तुम्हाला कोणासमोर प्रेम व्यक्त करायचे असेल, तर हा दिवस सर्वात उत्तम आहे.

Chocolate Day
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे : नात्यात गोडवा वाढवण्यासाठी आपल्या जोडीदाराला आवडते चॉकलेट गिफ्ट करा.

Teddy Day
१० फेब्रुवारी - टेडी डे : आपल्या जोडीदाराला क्युट टेडी बेअर देऊन त्यांचे मन जिंका.

Promise Day
११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे : या दिवशी आयुष्यभर साथ देण्याचे आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचे वचन दिले जाते.

Hug Day
१२ फेब्रुवारी - हग डे : एक प्रेमाची मिठी सर्व काही सांगून जाते. नात्यातील विश्वास वाढवण्यासाठी हा दिवस खास आहे.

Kiss Day
१३ फेब्रुवारी - किस डे : प्रेमातील ओलावा आणि ओढ व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Valentine's Day
१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे : आठवड्याचा शेवटचा आणि सर्वात मोठा दिवस! या दिवशी कपल्स एकमेकांसोबत वेळ घालवून हा दिवस संस्मरणीय बनवतात.

















