Valentine day : पार्टनरला काय गिफ्ट द्यायचं? असा विचार करत असाल तर 'हे' नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:21 PM2020-02-13T17:21:36+5:302020-02-13T17:51:21+5:30

व्हॅलेनटाईन वीकचा शेवटचा दिवस व्हॅलेनटाईन डे. सगळे कपल्स अगदी उत्साहात हा दिवस साजरा करणार. जर तुम्हाला आपल्या पार्टनरला गिफ्ट द्यायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास गिफ्टचे प्रकार सांगणार आहोत.

पार्टनरचा बर्थडे सोडून तुम्ही इतरवेळी गिफ्ट देत नसाल तर तुमच्यासाठी मस्त संधी आहे. व्हॅलेनटाईन डे ला गिफ्ट देऊन पार्टनरला खूश करू शकता.

गिफ्ट देणं म्हणजे नेहमीच खर्च करायला हवा असं नाही. कमीतकमी पैश्यात गिफ्ट घेऊन सुद्धा तुम्ही पार्टनरला खूश करू शकता.

अनेकदा तुम्ही पाहीलं असेल लाल रंगाचे वेगवेगळे कपडे किंवा कार्डस व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात असतात. तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर दैनंदिन वापरातील वस्तु सुद्धा तुम्ही पार्टनरला देऊ शकता.

पार्टनरला पिलो दिलात तर तुमची एक चांगली आठवण राहील.

मुलांना गिफ्ट करत असताना तुम्ही रोज लागणारं पाकीट आणि बेल्ट दिला तर खूपच उत्तम ठरेल. कारण या दोन वस्तु मुलं नेहमी वापरत असतात. शिवाय फारसा खर्च सुद्धा करावा लागणार नाही. तुमच्या पार्टनरच्या आवडत्या रंगाचे आणि पॅटर्नच्या वस्तु तुम्ही देऊ शकता.

तुम्हाला जर मुलीला गिफ्ट द्यायचं असेल तर टेडी बिअर सुद्धा देऊ शकता. अनेक मुलींना डेडी बिअरची आवड असते. तुम्ही जर हे गिफ्ट दिलं तर ते नेहमी स्वतः सोबत ठेवतील.