तुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 03:52 PM2019-09-17T15:52:37+5:302019-09-17T16:06:22+5:30

कोणत्याही नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असले तर ती म्हणजे एकमेकांचा सन्मान करणे आणि एकमेकांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणे. पण अनेकदा आपल्याला हे कळतच नाही की, आपला पार्टनर आपल्याला डॉमिनेट करत असतो म्हणजेच आपल्यावर वर्चस्व गाजवत असतो. हे असं वागणं तोपर्यंत ठीक असतं जोपर्यंत तुम्हाला भावनात्मक, मानसिक आणि शारीरिक रूपाने दुखावलं जात नाही. पण तुम्हाला तुमचा पार्टनर डॉमिनेट करतोय कसं ओळखाल? (Image Credit : www.lifealth.com)

नात्यासाठी आवश्यक काय? - प्रेम, सन्मान आणि समानता या गोष्टी कोणत्याही नात्यासाठी चांगल्या असतात. जर एक पार्टनर दुसऱ्याला नेहमी कमी लेखत असेल किंवा तसा प्रयत्न करत असेल तर हे नात्यासाठी अजिबात चांगलं नाही. ही स्थिती बदलण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

इन्व्हेस्टमेंट हवी- आर्थिक आणि सामाजिक जीवनाप्रमाणे खाजगी जीवनातही वेळ आणि ऊर्जेची गुंतवणूक करावी लागते. नातं व्यवस्थित राहण्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही दोघांनी सोबत वेळ घालवावा. एकमेकांसोबत तुमचं प्लॅनिंग आणि मनातील गोष्टी शेअर करा. जर एखादा पार्टनर वेळेच्या कमतरतेचं कारण देऊन नेहमी टाळाटाळ करत असेल तर हे योग्य नाही. (Image Credit : www.insider.com)

त्यांनाच सगळे निर्णय घ्यायचेत.. - महिला असो वा पुरूष, डॉमिनेटींग पार्टनरला सर्व निर्णय स्वत:च घेणं पसंत असतं. कधी कुठे फिरायला जायचं, किती खर्च करायचा, कोणते कपडे घालायचे, कुणाशी बोलायचं, कुणाशी नाही. तुमची प्रत्येक सवय आणि गरज त्यांना त्यांच्यानुसार करून घ्यायची असते. (Image Credit : lovebondings.com)

त्यांना सतत अटेंशन हवं असतं - डॉमिनेटींग पार्टनर हे त्यांच्या जोडीदाराबाबत फार जास्त कॉन्शस असतात. त्यांना जोडीदाराकडून सतत अटेंशन हवं असतं. असे लोक त्यांच्या जोडीदाराच्या गरजांना प्राथमिकता देत नाही. दरवेळी त्यांना त्यांच्या गरजा आणि कामे पूर्ण करायची असतात.

पर्सनल स्पेस हवी - प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पर्सनल स्पेसची गरज असते. प्रत्येक गोष्टीत किंवा कामात कुणी लुडबूड केलेलं त्यांना पसंत नसतं. जर तुमचा पार्टनर तुमच्या पर्सनल स्पेसचा सन्मान करत नसेल तर तो डॉमिनेटींग आहे असं समजा. (Image Credit : www.elitedaily.com)

असं का होतं? - सायकॉलॉजिनुसार, काही लोक हे डॉमिनेटींग पर्सनॅलिटीचे असतात, तर काही लोकांना ही सवय वेळ आणि परिस्थितींमुळे लागते. पण स्थिती काहीही असो एका पार्टनरमुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर यावर दोघांनी शांतपणे बोलायला हवं. (Image Credit : menn.is)

यात काही गैर नाही... - जर तुमच्या नात्यात तुम्हाला गुदमरल्यासारखं वाटत असेल तर त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही काउन्सेलरची मदत घेऊ शकता. याने तुम्हाला तुमचं नातं पुढे नेण्यासाठी आणि जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी मदत मिळेल. (Image Credit : www.huffingtonpost.in)