छोट्या भावंडांसाठी असं बना रोल मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:41 PM2019-08-21T14:41:50+5:302019-08-21T14:48:59+5:30

घरामध्ये लहान भाऊ-बहीण असल्याचे अनेक फायदे असतात. मात्र त्यांच्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या मंडळींवरची जबाबदारी वाढते.

छोट्या भावंडांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी त्यांच्यासोबत नीट वागणं गरजेचं असतं. त्यांना चांगल्या सवयी लावून त्यांच्यासमोर रोल मॉडेल कसं बनायचं हे जाणून घेऊया.

लहान भावंडांसोबत उत्तम संवाद साधा. त्यांच्यासमोर अपशब्द वापरू नका. प्लीज, सॉरी आणि थँक यू या शब्दांचं महत्त्व त्यांना पटवून द्या. तसेच ते शब्द वापरण्याची सवय लावा.

अनेकदा घरामध्ये भावंडांमध्ये काही कारणांवरून वाद अथवा भांडणं ही होत असतात. अशावेळी त्यांच्यावर रागवू नका. भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करा.

लहान बहीण-भावांसोबत मोकळेपणाने संवाद साधा, तसेच त्यांना फिरण्यासाठी बागेत अथवा इतर ठिकाणी घेऊन जा. एकत्र वेळ घालवा.

अनेकदा मुलांची चूक झाली की त्यांच्यावर ओरडलं अथवा रागावलं जातं. पण असं करू नका त्यांना त्यांची चूक नीट समजून सांगा.

घरापासून बाहेर असाल तर नेहमी भावंडांच्या संपर्कात राहा. त्यांची काळजी घ्या.

लहान मुलांमध्ये अनेक गुण असतात. त्यांच्यातील कलागुणांना वाव द्या. तसेच त्यांची आवड जपा. त्याचं कौतुक करा तसेच प्रोत्साहन द्या.