शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Friendship Day 2019 : 'फ्रेंडशिप डे'साठी युनिक गिफ्ट आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 11:22 AM

1 / 11
मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येकच दिवस खास असतो. मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजे, सेलिब्रेशनच असतं.
2 / 11
असं असलं तरिही वर्षभरातील एक दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो. ज्या दिवसाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते तो 'फ्रेन्डशिप डे' रविवारी 4 तारखेला साजरा होणार आहे. मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. पण आता टेक्नॉलॉजीच्या या युगात मैत्रीची परिभाषा बदलतेय असं वाटत असलं तरिही, अजुनही अनेकजण हा दिवस दणक्यात साजरा करतात.
3 / 11
आपल्या लाडक्या मित्र-मैत्रीणींसोबत असलेलं नातं आणखी खास करण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी का नाही या दिवशी एखादं गिफ्ट दिलं जावं. खरं तर बाजारात अनेक वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पण बाजारात गेल्यावर फार गोंधळ उडतो. हे घेवू की ते घेवू... काहीही समजत नाही. अशातच तुम्हीही खास गिफ्ट घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला काही गिफ्ट ऑप्शन सांगणार आहोत.
4 / 11
तुम्ही तुमच्या खास मित्राला एखादा पर्सनलाइज्ड कॉफी मगही देऊ शकता. शक्य असल्यास त्या मगवर त्यांचा एखादा छानसा फोटो आणि त्यावर एक मेसेज लिहू शकता.
5 / 11
अनेकदा फ्रेंड सर्कलमध्ये एखादं कोणीतरी असं असतंच ज्याला वेळ पाळणं अजिबात जमत नाही. तुमचाही एखादा मित्र किंवा मैत्रिण अशी असेल तर तुम्ही त्याला हटके स्टाइलने वेळ पाळायला शिकवू शकता. त्यांना एखादं छानसं घड्याळ गिफ्ट करा.
6 / 11
आपल्यापैकी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी गोष्ट म्हणजे, पर्स. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणीला एखादी छानशी पर्स गिफ्ट करू शकता.
7 / 11
तुमचा आणि तुमच्या मित्राचा एखादा छानसा फोटो किंवा एखादा मेसेज लिहून तुम्ही पर्सनलाइज्ड किचैन देऊ शकता.
8 / 11
तुम्ही पिलोही कस्टमाइज करू शकता. त्यावर तुमचे एखादा छानसा फोटो किंवा मेसेज लिहून गिफ्ट करू शकता.
9 / 11
तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या आठवणी या बुकमध्ये लिहू शकता. आठवणींना उजाळा देणारी ही बुक खरचं खूप युनिक गिफ्ट ठरेल.
10 / 11
तुमचा मित्र किंवा मैत्रीण ऑफिसला जात असेल तर तुम्ही त्यांना बॅग गिफ्ट करू शकता.
11 / 11
आठवणींना उजाळा देण्यासाठी हे गिफ्ट सर्वांपेक्षा वेगळं ठरेल. तुम्ही तुमचे काही खास क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केले असतील तर तुम्ही त्यांची एक सुंदर फ्रेम करून गिफ्ट करू शकता.
टॅग्स :Friendship Dayफ्रेंडशिप डेRelationship Tipsरिलेशनशिप