1 बीएचके फ्लॅटची किंमत किती? मुंबई पुणे भाडे किती? कोणत्या किंमतीतील घरे जास्त विकली जातायत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 10:34 IST2023-12-22T10:26:56+5:302023-12-22T10:34:29+5:30
छोट्या घरांची मागणी घटली. देशात वेगळाच ट्रेंड, आता मोठी घरेच बनविणार का?

गेल्या वर्षभरात महागड्या घरांची विक्री वाढली आहे. त्या तुलनेत मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. मात्र, ४० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची विक्री सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे.
१ बीएचके घरे या श्रेणीत येतात. मात्र, काही शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी १ बीएचके घरेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा घरांची कोणत्या शहरात किंमत, त्याचे घरभाडे किती आहे, जाणून घेऊ या...
मुंबईत अंधेरीसारख्या मोक्याच्या ठिकाणी १ बीएचके घर घ्यायचे असल्यास किमान १ कोटी रुपये मोजावे लागतात. या ठिकाणी घरभाडेही भरपूर मिळते.
त्यानंतर बंगळुरू आणि नवी दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घरांच्या किमती येतात. इतर प्रमुख शहरांमध्ये किंमती ४० लाख रुपयांच्या आसपास आहेत.
नाईट फ्रॅंकच्या अहवालानुसार...
५० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ९,९३० घरांचीच विक्री पहिल्या सहामाहीमध्ये झाली
५० लाख ते १ कोटी रुपये किंमतीच्या २९,८२७ घरांची विक्री या कालावधीत झाली.
१ कोटीपेक्षा जास्त किंमतीची २८,६४२ घरे पहिल्या सहामाहीत विकली गेली.
घरभाडे मिळवण्यातही ही शहरे आघाडीवर
मुंबई (अंधेरी) ५०० चौरस फूट - ६० हजार; बंगळुरू (कोरमनगला) ६०० चौरस फूट - २५ हजार; कोलकाता (न्यू टाऊन) ६०० चौरस फूट - १५ हजार; नवी दिल्ली (वसंत कुंज) ६५० चौरस फूट - २० हजार; पुणे (हिंजेवाडी) ४५० चौरस फूट - १५ हजार; हैदराबाद (बेगमपेट) ५५० चौरस फूट - ९ हजार
सुरत (अदाजन) ६०० चौरस फूट - १३ हजार; चेन्नई (अण्णा नगर) ५०० चौरस फूट - १५ हजार; अहमदाबाद (बोपल) ४५० चौरस फूट - १५ हजार; मैसूर (जेपी नगर ६०० चौरस फूट - ९ हजार; पंजाब (झिरकपूर) ७२५ चौरस फूट - १५ हजार; लखनऊ (गोमती नगर) ५०० चौरस फूट - ९ हजार