Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 17 ते 23 एप्रिल 2022; महत्त्वाचे निरोप येतील, आठवड्यातील 'हे' दिवस तुमच्यासाठी चांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 09:02 AM2022-04-17T09:02:07+5:302022-04-17T09:09:35+5:30

Weekly Horoscope 17 to 22 April 2022: कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 18 रोजी नेपच्यून ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. ग्रहस्थिती अशी - रवी, राहू, हर्षल आणि बुध हे मेष राशीत. केतू तूळ राशीत. शनी व प्लुटो मकर राशीत. मंगळ, शुक्र युती कुंभ राशीत. गुरू, नेपच्यून मीन राशीत राहतील. चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशीतून राहिल. रविवार 17 एप्रिल 2022 रोजी चैत्र कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी रात्री 10.02 पर्यंत राहिल. सकाळी 7.17 पर्यंत चित्रा तर त्यानंतर दुसऱ्यादिवशी उत्तर रात्री पहाटे 5.34 पर्यंत स्वाती नक्षत्र राहिल. रास तूळ राहिल. दिवस चांगला आहे, राहू काळ सायंकाळी 4.30 ते 6 या वेळेत राहिल.

मेष- महत्त्वाचे निरोप येतील - अनुकूल घटना घडतील, अपेक्षित पत्रव्यवहार होईल. महत्त्वाचे निरोप येतील. ज्या संधीची वाट पाहत होतात, ती मिळण्याची शक्यता आहे. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. सप्ताहाच्या पूर्वार्धात प्रवासात दगदग होईल. त्यामुळे, प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. उतर्रार्धात अनुकूल प्रवास होतील. आर्थिक आवक चांगली राहिल, जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस

वृषभ - अनेकांचे सहकार्य मिळेल, आर्थिक आवक चांगली राहिल. मात्र, देण्याघेण्याचे व्यवहार जपून करा. थोडी दगदग होईल, प्रवासात अडचणी येतील. सामान, कागदपत्रांची काळजी घ्या. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. अनेकांचे सहकार्य मिळेल. अनपेक्षितपणे लोक मदत करतील. एखादी व्यक्ती अपेक्षाभंग करेल. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार, चांगले दिवस

मिथुन- प्रगती होईल - नोकरी व्यवसायात प्रगती होईल. अनुकूल घटना घडतील. चांगल्या संधी चालून येतील, प्रवासात काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मनात सैरभैर विचार सुरू असताना वाहन चालवणे टाळा. आर्थिक आवक चांगली राहिल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. आर्थिक उलाढाली जपून करा, कुणी तुम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करू शकते. टीप - रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस

कर्क - ग्रहमान अनुकूल राहिल - ग्रहमानाची समर्थ साथ राहिल, त्यामुळे कामे आटोक्यात येतील. अनेकांचे सहकार्य मिळेल, थोडी आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या संधी चालून येतील. नवीन संधी फायद्याच्या ठरतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रवासाचे योग येतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे काम पूर्वार्धात उरकून घ्या. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. प्रलंबित कामांची यादी बनवून प्राधान्यक्रम ठरवा. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार चागंले दिवस

सिंह- नवीन संधी मिळेल - संमिश्र ग्रहमान राहिल, जवळचे प्रवास होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवासायात मोठे धाडस करू नका. नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येतील, मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. घरात वादविवाद होण्याची शक्यता. मोहाच्या जाळ्यात अडकवणार नाही, याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या, खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा टीप - मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस

कन्या - धनलाभ होईल - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे, मनासारखी आर्थिक प्राप्ती होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी भेटीगाठी होतील. प्रवास घडून येतील, व्यवसायात चांगली विक्री होईल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन संधी मिळेल, नवीन जबाबदारी अंगावर पडेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. पाहुण्या-रावळ्यांचा आदर राहिल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहितील. नात्यात सूर जुळतील, भेटवस्तू देण्यास हरकत नाही. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार चांगले दिवस

तूळ- अनेक लाभ होतील - हा सप्ताह तुम्हाला विविध लाभ देईल. मनात आनंदी विचार राहतील. धनलाभ होण्याची शक्यता. एखाद्या सौद्यात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल, घरी पाहुणे येतील. एखाद्या मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. मात्र, कामाचा ताण राहिल. व्यावसायात बरकत राहिल. मुलांना चांगल्या संधी मिळतील. मात्र, त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. टीप - मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस

वृश्चिक - सकारात्मक स्थिती - चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. त्यामुळे, खिसा रिकामा होईल. मात्र, आर्थिक आवक चांगली राहिल. त्यामुळे, खर्च केलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळतील. मन प्रसन्न राहिल. जीवनसाथीशी सूर जुळतील. नात्यात गोडवा राहिल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. एखादी अपेक्षित संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. अपेक्षित संधी मिळेल. नोकरीत सहकार्य मिळेल. टीप - मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस

धनू- नोकरीत अनुकूल स्थिती - यशदायक कालखंड आहे, ग्रहांची भ्रमंती अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आर्थिक आवक चांगली राहिल. भावंडांशी सख्य राहिल, त्यांची मदत मिळेल. इतरांच्या भानगडी मिटविण्यासाठी वेळ द्याल. प्रवास घडतील, निष्कारण खर्च होईल. जीवनसाथीकडून भेटवस्तू मिळतील. नोकरीत अनुकूल प्रगती होईल. काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. काहींना पगारवाढ मिळेल, व्यावसायात बरकत येईल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. टीप - रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस

मकर- नवीन संधीचा फायदा - अतिशय अनुकूल परिस्थिती राहिल. उत्साह वाढविणाऱ्या घटना घडतील. नोकरीता कामाचा ताण कमी होईल. तुमच्या कामाचे कौतूक होईल. नवीन संधी मिळेल, त्या संधीचा फायदा होईल. धनलाभाच्यादृष्टीने अनुकूल काळ आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अनेक प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. खाण्यापिण्याची लयलूट राहिल. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस

कुंभ- कामे मार्गी लागतील - भाग्याची चांगली साथ राहिल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. नवीन संधी मिळेल, आर्थिक आवक चांगली राहिल. जीवनासाथीशी मधूर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील, व्यवसायात बरकत राहिल. मालाची विक्री चांगली होईल, नफ्याचे प्रमाण वाढेल. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. महत्त्वाच्या कामाता यश मिळेल. कायद्याची बंधने पाळा, सही करताना मजकूर वाचून घ्या. टीप - मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस

मीन- भाग्य साथ देईल - नशिबाची साथ मिळेल, पर्यटनाच्यादृष्टीने प्रवास होईल. मनावरचा ताण हलका होईल, नोकरीत नवीन जबाबदारी पडेल. घरी पाहुणे येतली, खाण्या-पिण्याची चंगळ राहिल. घरात मिठाई आणली जाईल. एखाद्या छोटेखानी समारंभाचे आयोजन केले जाईल. विविध प्रकारचे लाभा होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात याल. त्यांच्यावर खर्च कराल. टीप - मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)