आठवड्याचे राशीभविष्य : 9 मे ते 15 मे 2021, 'या' राशीच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा, मानहानीपासून जपून राहा

Published: May 10, 2021 11:15 AM2021-05-10T11:15:23+5:302021-05-10T11:30:13+5:30

Weekly Horoscope 9 May to 15 May 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा मनोरंजनाचा असल्याने आपणास कंटाळा येणार नाही व त्यामुळे आपली सर्व कामे आपण पूर्ण उत्साहात कराल. प्रणयी जीवन आनंदित करण्यासाठी आपली प्रिय व्यक्ती आपणास एखादी चांगली भेट पुस्तकाच्या स्वरूपात देऊ शकेल. कौटुंबिक जीवनात आपण तणावमुक्त होऊन कुटुंबियांसह बसून काही चांगल्या कौटुंबिक गोष्टी आठवत बसाल. नोकरी करणाऱ्यांना एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. आपली प्राप्ती उत्तम असेल. व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयांसाठी एखाद्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. ह्या आठवड्यात आरोग्य चांगले राहिले तरी आपणास जिभेचे लाड पुरविण्यापेक्षा शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष देऊन त्यानुसार समतोल आहार घ्यावा लागेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे.

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण खूप हौसमौज करून उत्सवी वातावरणाचा आनंद घ्याल. नवीन चष्मा खरेदी करून आपल्या मित्रांना प्रभावित करण्याचा प्रयत्न कराल व स्वतः आनंदित व्हाल. परंतु अति प्रमाणात बाहेरील वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे आरोग्यासाठी घातक असते हे ध्यानात ठेवावे. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात स्नेह व प्रेम वृद्धिंगत होऊन गैरसमज दूर होतील. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या प्रियव्यक्तीच्या मनातील भावना ओळखण्याची संधी मिळेल. आपली प्रियव्यक्ती आपल्या पाऊलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करेल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापाऱ्यांना मोठे लाभ संभवतात. ह्या आठवड्यात प्रवासा दरम्यान नवीन ओळखी होऊन आपला फायदा होईल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपली प्राप्ती व व्याप्ती वाढेल. लोक आपल्या कामांची प्रशंसा करतील. खर्चात वाढ झाल्याने आपण त्रासून जाल. ह्या दरम्यान आपणास एखादे व्यसन लागण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल तसेच अशा परिस्थितीत आपली एखादी खास व्यक्ती आपल्या मदतीस धावून येऊ शकेल. ह्या आठवड्यात कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस परदेशी जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात ऋतुजन्य विकार होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रणयी जीवनात प्रगती होईल. वैवाहिक जीवनात अधून मधून काही खटके उडण्याची शक्यता असली तरी एकंदरीत आनंदच पसरेल. संबंधातील जवळीक वाढेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीस आपण व्यावसायिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित कराल. काहीही झाले तरी आपले लक्ष नोकरी किंवा व्यापारात प्रगती करण्याकडेच असेल. आपण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न कराल. आपल्या बौद्धिक चातुर्याने आपण व्यवसायात किंवा नोकरीत काही चांगले करण्याच्या स्थितीत राहाल. आठवड्याच्या सुरवातीस आपण व्यावसायिक बाबींवर लक्ष केंद्रित केल्याने व्यक्तिगत संबंधांसाठी वेळ देता येणार नाही. हळू हळू परिस्थितीत सुधारणा होईल. आठवड्याच्या मध्यास आपणास नैराश्य आल्याने आपण एकांतात राहण्यास प्राधान्य द्याल. असे असले तरी आठवड्या अखेरीस आपण पुन्हा उत्साहित होऊन आपल्या प्रियजनांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न कराल. एकंदरीत हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी काहीशा नाजूक अवस्थेत होऊन आठवडा सामान्य फलदायीच ठरेल. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. असे असले तरी कामाच्या ठिकाणी वायफळ बोलण्याने आपणास लज्जित होण्याची परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आपण सावध होऊन अशा गोष्टींपासून दूर राहावे. कोणाचा अपमान करू नका, तसेच विनाकारण थट्टा करण्यापासून दूर राहा. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल्यामुळे आपण आनंदित व्हाल. संपत्ती लाभ होईल. कष्टाचे यथोचित फळ मिळेल. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा नाजूक आहे. विवाहितांसाठी मात्र आठवडा चांगला आहे. त्यांना आपल्या जीवनात परमोच्च सुख उपभोगता येईल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहू शकाल. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी आपली कामगिरी उत्तम झाल्याने आपली स्थिती भक्कम होईल. आपले विरोधक सुद्धा आश्चर्यचकित होतील. खर्चात वाढ झाली तरी प्राप्तीत सुद्धा हळूहळू वाढ होईल. ह्या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबियांच्या गरजांकडे लक्ष देऊन त्यानुसार घरगुती खर्च सुद्धा कराल. आपली प्रकृती उत्तम राहिली तरी सर्दी, पडसे किंवा तापाने आपण बेजार होण्याची शक्यता सुद्धा आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम व परस्पर समन्वय असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्ती समोर काही वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हावे लागेल. तसे केल्यासच त्यांच्या प्रणयी जीवनात आनंद पसरून एक नवा तजेला निर्माण होऊ शकेल. व्यापारी वर्गास अपेक्षेनुसार परिणाम मिळण्याची शक्यता नसल्याने थोडे सावध राहावे लागेल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

आठवड्यात आपण स्वतःकडे लक्ष द्याल. ह्या पूर्वी आव्हानांचा सामना करण्यात आपली दमछाक झाली असेल तेव्हा आता विश्रांती घेण्याचा विचार सुद्धा आपण करू शकाल. आपल्यावर कामाचा दबाव राहील, व ते वेळेवर पूर्ण करण्याचे आव्हान सुद्धा आपल्या समोर असेल. नोकरीत आपली कामगिरी उत्तम होईल. आपण एक - दोन दिवस सुट्टी घेऊन कुटुंबियांसह वेळ घालविण्यास प्राधान्य देऊ शकाल. हा आठवडा व्यापारासाठी सामान्यच आहे. आपली दमछाक झाल्याने आपल्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शरीरास बेचैनी किंवा अनिद्रेचा त्रास संभवतो. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. आपण आपल्या प्रियव्यक्तीशी प्रत्येक बाबतीत सहमत व्हाल. वैवाहिक जीवनात छोटे - मोठे वाद संभवत असले तरी त्यात एक प्रकारचा उत्साह सुद्धा असेल. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल असल्याने, शक्यतो प्रवास टाळावेत. आपल्या प्रकृतीत चढ - उतार होण्याच्या शक्यतेमुळे समतोल आहार घेण्यावर भर द्यावा. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल व त्यातून त्यांना चांगला लाभ सुद्धा होईल. आपली कामात प्रगती होईल. आपली पदोन्नती संभवते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण नवीन योजना आखून आपला व्यापार वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करून त्यात यशस्वी व्हाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमालाप वाढून नात्यातील नीरसता संपुष्टात येईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. त्यांना आपल्या प्रियव्यक्तीशी संवाद साधण्याची व सहवासाची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य सामान्यच राहील.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होऊन त्यांना त्यात यश प्राप्त होऊ शकेल. विवाहितांना संततीच्या प्रगतीने आनंद प्राप्त होईल. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. काही कारणाने आपला जोडीदार आपल्यावर नाराज होण्याची शक्यता असल्याने जोडीदाराचा राग शांत करण्यासाठी जोडीदारासह संवाद साधून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. प्रणयी जीवनात संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. समस्या कमी होऊ लागतील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपण विदेश गमनाचा प्रयत्न कराल. व्यापाऱ्यांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. महिलांशी सभ्यतेने वागणे आपल्यासाठी उपयुक्त होईल.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास कामात यश प्राप्त होईल. प्रवासाची उत्तम संधी मिळेल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. कौटुंबिक मान - सन्मान होतील. शासनाकडून घर किंवा वाहन सौख्य मिळू शकते. नोकरीत कामाकडे आवश्यक लक्ष न दिल्यास समस्या वाढू शकतात. व्यापारात मोठा लाभ होईल. आपल्या व्यावसायिक भागीदाराची आपणास मदत होईल. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनात जोडीदाराशी जवळीक साधता येईल. प्रणयी जीवनात आपल्या प्रिय व्यक्तीचे हृदय जिंकण्यासाठी तीला / त्याला महागडी वस्तू भेट देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्या लागतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आपण प्रत्येक काम मनापासून कराल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपले कुटुंब व कौटुंबिक जवाबदाऱ्यांकडे विशेष लक्ष द्याल. धन प्राप्तीचा विचार कराल. काही नवीन योजना आखाल, व त्या फलद्रुप होतील. आपणास शासना कडून काही लाभ संभवतो. नोकरीत काम करण्याचा आनंद घेता येईल. आपले विरोधक शांत होतील. व्यापाऱ्यांना आपला व्यापार प्रगतीपथावर नेण्यासाठी काही नवीन लोकांची मदत घावी लागू शकते. विवाहितांच्या जीवनात समजूतदारपणा वाढेल. एकमेकांना समजून घेऊन आपले वैवाहिक जीवन समृद्ध करण्यात दोघेही आपला वाटा उचलतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा नाजूक असू शकतो. आपसातील संघर्ष नात्यात नाजूकपणा निर्माण करू शकतो. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता कमी असल्याची जाणीव होईल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या अपेक्षेनुसार यश प्राप्त झाल्याने आपण आनंदित व्हाल व आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी फायदेशीर आहे. आपण पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात वाढ झाली तरी आपण त्याची तमा बाळगणार नाही. आपली प्रकृती उत्तम राहील. जुन्या आजारातून मुक्तता होईल. कुटुंबात समन्वय साधला जाईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. आपण आपल्या नात्यात प्रगती कराल. आपले वैवाहिक जीवन आनंदित करण्यात आपण यशस्वी व्हाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आपल्या व सासुरवाडीकडील कुटुंबियांचे एकमेकांना भेटणे होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होऊन त्यांना चांगले यश प्राप्त होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!