आठवड्याचे राशीभविष्य : 25 जुलै ते 31 जुलै 2021; 'या' राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती, परदेशात जाण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 10:17 AM2021-07-26T10:17:00+5:302021-07-26T10:20:02+5:30

Weekly Horoscope 25 July to 31 July 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे आपल्या काळजीत वाढ होण्याची शक्यता असून त्याचा आपल्या कामावर प्रभाव होताना सुद्धा दिसून येईल. आपल्या जवाबदाऱ्या ओळखा. कुटुंब व व्यावसायिक जीवनात समतोल साधण्याचा प्रयत्न करा. आपणास आर्थिक चिंता भेडसावणार नसली तरी आठवड्याच्या अखेरीस अचानकपणे मोठा खर्च होणार असल्याने आधी पासूनच खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपले प्रणयी जीवन सुखद होण्यासाठी आपण रोमान्सच्या व्यतिरिक्त आपल्या प्रिय व्यक्तीस एखादी भेटवस्तू देऊ शकता. असे करून सुद्धा आपल्या एखाद्या कृतीने आपली प्रिय व्यक्ती नाराज होण्याच्या शक्यतेमुळे नात्यात समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा काळजी घ्यावी. विवाहितांच्या जीवनात प्रेम वाढून जोडीदारासह मजेत वेळ घालविण्याची संधी मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण सर्व कामे मनापासून कराल.

आठवड्यात आपणास काही नवीन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या दरम्यान असा काही तरी नवीन विचार करा कि जेणे करून आपले जीवन आनंदी होईल. कुटुंबियांच्या सहवासात आपण आनंदून जाल. ह्या आठवड्यात आपण एखादे नवीन वाहन खरेदी करू शकाल. हे वाहन आधुनिक पद्धतीचे व आरामदायी असेल. नोकरीत विनाकारण कोणत्याही गोष्टीस आत्मसन्मानाशी जोडल्यास आपणासच त्रास होईल, तेव्हा काळजी घ्यावी. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपले प्रयत्न यशस्वी होतील. प्रणयी जीवनातील तणाव दूर होईल. आपली प्रिय व्यक्ती आपल्या कुटुंबियांचे हृदय जिंकण्यास सुरवात करेल. आपले वैवाहिक जीवन आनंदी राहील. आपला वैवाहिक जोडीदार घरगुती खर्चांवर भर देईल. आपले आरोग्य उत्तम राहील. मात्र बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. ह्या आठवड्यात प्रवास करण्या ऐवजी कुटुंबियांना अधिक वेळ देण्यास आपण प्राधान्य द्याल.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली बँकेतील शिल्लक हळू हळू वाढू लागेल. आपण बचत करावयास शिकून एखाद्या नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकाल. भविष्यात काही चांगले परिणाम मिळविण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. प्रवासाची संधी मिळेल. ह्या संधीमुळे आपला फायदा होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचा भरपूर सहवास आपणास लाभेल. विवाहितांच्या जीवनात प्रेमा बरोबरच समजूतदारपणा सुद्धा वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फल मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी एखादी खुशखबर घेऊन येईल. आपणास विवाह व कार्यक्रम व्यवस्थापनाशी संबंधित कामात मोठा लाभ होऊ शकतो.

आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित कराल. दरम्यान आपणास नात्यातील भावनाशीलता शिकण्यास मिळण्याची शक्यता आहे. आपण आपले छंद जोपासण्यासाठी खर्च करू शकाल. ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत हळू हळू वाढ होईल. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास लाभ होंऊ शकतो. ह्या आठवड्यात कुटुंबियात उत्तम तालमेल असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. ह्या दरम्यान वायू प्रकोप किंवा यकृताशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या व्यस्ततेमुळे आपण कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. त्याचा आपल्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम होऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस आपल्या स्थितीस किंवा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढली तरी त्यात घाई करू नये. प्रवासात सावध राहावे.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. असे असले तरी आठवड्याची सुरवात काहीशा नाजूक अवस्थेतच होईल. अशा परिस्थितीत आपणास आपले खर्च व वाढत्या चिंता ह्यावर लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत चिंताना थारा देऊ नका, अन्यथा त्याच्या दबावाचा आपणास त्रास होईल. नोकरीत आगामी काळात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असल्याने ह्या आठवड्यात थोडे जास्त कष्ट करावे लागतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत चांगला आहे. प्रॉपर्टीशी संबंधित, बांधकामाशी संबंधित, विवाहाशी संबंधित, सल्ल्याशी संबंधित व स्टेशनरीशी संबंधित कामे ह्यात मोठा फायदा होऊ शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. ते एकाग्रतेने अभ्यास करू शकतील. त्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल. प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याच्या अखेरीस मन काहीसे चिंतीत होईल.

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण सासुरवाडी कडील लोकांशी एखाद्या गोष्टीचा खोलवर विचार - विनिमय कराल. आपल्या काळजीत भर पडेल. आपण जोडीदाराच्या एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊन सासुरवाडी कडील लोकांशी त्या संबंधीच चर्चा कराल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या नात्यातील प्रेम वाढेल. मात्र जे लपून छपून प्रेम करतात त्यांचे प्रेम ह्या आठवड्यात सर्वां समोर येण्याची शक्यता असल्याने त्यांनी असे कोणतेही कृत्य करू नये कि जेणे करून मागाहून त्यांना पश्चाताप करावा लागेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य चांगले राहील. जुन्या आजारातून सुद्धा मुक्तता होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण अत्यंत आनंदित व्हाल. आपण आपल्या वरिष्ठांसह एखाद्या नवीन कामावर कार्यरत होऊ शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी यशदायी ठरणारा आहे. आपणास कोणत्याही प्रकारे संपत्ती लाभ होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपण एखादे मोठे वाहन सुद्धा खरेदी करू शकाल. कुटुंबियांसह कुलदेवी किंवा देवतेच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. त्यामुळे आपल्या मनास शांतता लाभून एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी आनंददायी आहे. आपल्या नात्यातील रोमांस चरम सीमेवर असेल. विवाहित व्यक्तीना आपले वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. काहीजण विवाहबाह्य संबंधात व्यस्त राहण्याची शक्यता असून आपल्या वैवाहिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची संभावना असल्याने त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकिवात येईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे.

हा आठवडा चांगला जाण्यासाठी आपण काहीही कमी पडू देणार नाही, व त्यासाठी खूप कष्ट सुद्धा घ्याल. हा आठवडा क्रियाशील राहण्याचा आहे. हि क्रियाशीलता आपल्या उपयोगी पडेल. कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नती संभवते. आपल्यावर नवीन कामाची जवाबदारी सोपवली जाऊ शकते, व त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढून आपली कामावरील पक्कड मजबूत होईल. व्यापारीवर्गास व्यापारात मोठा फायदा होईल. आपल्या योजना आपल्यासाठी फलदायी ठरतील. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील व आपण पूर्ण शक्तीने आपली कामे पूर्ण कराल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. असे असून सुद्धा काही लहान - सहान समस्यांमुळे आपल्या जोडीदाराच्या नाराजीस जरी सामोरे जावे लागू शकले तरी आपले वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी काहीसा नाजूक आहे. त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास कुटुंबियांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा ते आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात आपल्या चूका शोधण्यात येण्याची शक्यता असून त्याचा फायदा इतर लोक घेऊ शकतात. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. आपल्या व्यापारास गती देण्यासाठी आपणास नवीन भांडवलदार शोधावा लागू शकतो. विवाहितांना आपल्या सासुरवाडी कडील लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नाते अधिक दृढ होईल. वैवाहिक जोडीदार सुद्धा आपली प्रशंसा करत राहील. प्रेमीजन आपल्या प्रिय व्यक्तीस दूरवर फिरावयास घेऊन जाऊ शकतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा झाली तरी बेफिकीर राहू नये. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण विनाकारण चिंताग्रस्त व्हाल, व त्यातून बाहेर पडण्यास आपणास वेळ तर लागेलच शिवाय त्यासाठी आपणास खूप प्रयत्न सुद्धा करावे लागतील. आपला वैवाहिक जोडीदार आपणास त्यासाठी मदत करेल, ज्यात सुरवातीस आपणास त्याचा / तिचा राग येईल, मात्र नंतर त्याचे / तिचे आपण आभारी व्हाल. नात्यात सुधारणा होईल. आपसातील समजूतदारपणा वाढेल. कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या सासुरवाडी कडील लोकांसह एखाद्या समारंभास उपस्थित राहू शकाल. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना एखादी नवीन संधी मिळेल. आपली प्राप्ती सामान्यच राहील, मात्र इतरांना उधारीवर पैसे देणे नुकसानदायी होऊ शकेल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात नवीन काही गोष्टी समजून घेण्याची संधी मिळेल. ह्यात मुख्यत्वे आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत अधिक माहिती मिळू शकेल व त्याने आपल्या मनात त्यांच्या बद्धल आदर वाढेल. आठवड्याच्या मधल्या दिवसां पासून अखेरच्या दिवसां पर्यंतचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या खर्चात वाढ होऊन बँकेतील शिल्लक कमी होण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. प्राप्ती सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कामाचा मोठा फायदा होईल. आपली पगारवाढ होऊ शकते. तसेच आपला कार्यभार सुद्धा वाढविण्यात येऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. आपण एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता असून व्यापार वृद्धी सुद्धा संभवते. लोकां बरोबर भागीदारी सुद्धा होऊ शकते. कौटुंबिक जीवन आनंदी होईल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. विवाहितांचे जीवन प्रेममय असेल. ते एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी सोडणार नाहीत. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या प्राप्तीत वाढ होऊ लागेल. खर्च झाले तरी काळजी करावी लागणार नाही. आरोग्य बिघडले तरी आपण काहीही करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याच्या प्रयत्नात यशस्वी व्हाल. वेळो वेळी प्राणायाम करून स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामावर खूप लक्ष द्यावे लागेल. कार्यालयात कष्ट करून स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात धन प्राप्ती होईल. आपणास व्यापारात खूप मोठा फायदा होईल. आपला व्यावसायिक भागीदार आपल्या खुषीस कारणीभूत ठरेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. वैवाहिक जोडीदारामुळे आपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांना सुद्धा ह्या आठवड्यात आनंद उपभोगण्याची संधी मिळेल व त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीशी आपले संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्त होईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.