आठवड्याचे राशीभविष्य : 20 जून ते 26 जून 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:10 PM2021-06-20T12:10:18+5:302021-06-20T12:27:15+5:30

Weekly Horoscope 20 June to 26 June 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

ह्या आठवड्यात आपणास आत्मपरीक्षण करण्याची इच्छा होईल. आपली वाणी भारदस्त होईल व आपण आव्हानांचा समर्थपणे सामना करू शकाल. काही चिंता वाढल्या तरी आपले मनोबल कमी होणार नाही. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. आपणास धनलाभ होऊन आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपल्या कुटुंबातील महिलांचा योग्य तो मान ठेवा. प्रणयी जीवन यशस्वी होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. आपली प्रकृती चांगली राहिली तरी कंबरदुखी किंवा छातीत जळजळ होण्याची शक्यता असल्याने थोडी काळजी घ्यावी. आपणास नवीन कपडे खरेदीची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. आपल्या मित्रांसह दूरवर फिरावयास जाऊ शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या जीवनात असलेल्या समस्याने घाबरून न जाता त्यांचे निराकरण कसे करावयाचे ह्याचा विचार करून वाटचाल करावी. आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होऊन आपला समजूतदारपणा वाढेल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी खूपच चांगला आहे. एकमेकांशी संपर्क वाढल्याने आपसातील प्रेमात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टाचे चांगले फल मिळेल. व्यापाऱ्यांना आपल्या प्रयत्नांमुळे व मित्रांच्या मदतीमुळे खूप मोठा फायदा होईल. आपली प्रकृती उत्तम राहिली तरी आपणास डोळे दुखण्याची समस्या संभवत असल्याने डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणाव संपुष्टात येतील. आपण स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी व्यायामशाळेत जाल किंवा घरी राहून काही व्यायाम कराल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होईल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण काळजीत असाल. एखादी अनामिक भीती सुद्धा आपणास त्रस्त करेल. आपणास आपली प्रकृती व आपल्या जीवनाची काळजी वाटेल, मात्र त्या मागे कोणतेही मोठे कारण नसेल. काळजी करण्या सारखे काही नाही. कामाच्या बाबतीत आपण अति चिंतीत व्हाल, परंतु घाबरण्या सारखे काही नसून आपले काम योग्य प्रकारे होईल. व्यापारात सुद्धा सहजपणे लाभ होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. कुटुंबातील एखाद्या मांगलिक कार्याने आपण आनंदित व्हाल. कुटुंबात सुद्धा एकजूट असल्याचे दिसून येईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण प्रिय व्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात हा आठवडा महत्वाचा राहील, मात्र आपण आपल्या वागणुकीमुळे आपल्या दांपत्य जीवनात कटुता निर्माण करण्याची शक्यता असल्याने आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल.

आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवू शकाल. ह्या दरम्यान आपण आपले प्रणयी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न कराल. आपण आपल्या लोकांच्या सहवासात राहण्यास प्राधान्य द्याल. आठवड्याच्या मध्यास आपणास आपल्या जीवनशैलीस शिस्त लावण्यावर भर द्यावा लागेल. ह्या दरम्यान आपणास समतोल आहार व विश्रांतीसाठी काही कडक नियमावलीची आवश्यकता राहील. असे केल्याने आपण अनेक आरोग्य विषयक समस्यां पासून दूर राहू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपली सक्रियता वाढेल. ह्या दरम्यान आपण प्रगतीपथावर वाटचाल करू शकाल. ह्या आठवड्यात व्यवसायात सुद्धा आपली कामगिरी उत्तम होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात देवावर विश्वास ठेवून आपली मेहनत वाढवावी. ह्या दरम्यान व्यावसायिक आघाडीवर त्वरित परिणाम मिळण्याची आशा बाळगू नये. ह्या दरम्यान आपल्या क्षमतेहून अधिक काम करण्या पासून किंवा आर्थिक जोखीम घेण्या पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांना आठवड्यात मेहनत वाढविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रवासात काळजी घ्यावी.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याची सुरवात एखाद्या प्रवासाने होऊ शकेल. हा प्रवास आपणास हृदयाच्या नवीन तारा छेडण्यास मदतरूप होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असला तरी आपली श्रीमंती दाखविण्याच्या नादात आपल्या खिशाला परवडेल इतकाच खर्च करावा, अन्यथा आर्थिक चणचण जाणवेल. खर्च होतच राहतील. प्राप्तीत कपात होईल. आरोग्यात चढ - उतार येतील. ऋतुजन्य विकार किंवा सांधेदुखी अथवा पायदुखी ह्यांचा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. नोकरीत आपली तीव्र बुद्धी आपल्या कामी आल्याने आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या नाते संबंधातील त्रासांना सामोरे जावे लागू शकते. आपले प्रणयी जीवन सुखद करण्यासाठी आपणास काही ठोस पाऊले उचलावी लागतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे काही क्षण आल्याने ते त्याचा पुरेपूर उपभोग घेऊ शकतील. आपल्या संतती प्रति आपली जवाबदारी पार पाडण्यासाठी आपण गंभीरपणे विचार कराल. आपली प्रकृती चांगली राहील. आपण एखाद्या धार्मिक स्थळी प्रवासास जाऊ शकाल. आपणास आनंद होईल अशा एखाद्या ठिकाणी आपण जाऊ शकाल किंवा मित्रांसह व जवळच्या नातेवाईकांसह एखादी मेजवानी आयोजित करू शकाल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी व्यापार विस्तार करण्याचा आहे. आपण योग्य प्रकारे काम करण्याची व आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास आपल्या अंगात स्फूर्ती असल्याचे जाणवेल व त्यामुळे सर्व कामे नियोजित वेळे पूर्वी पूर्ण करण्यास आपले प्राधान्य राहील. आपण कामाचा समतोल साधू शकता व त्याचा फायदा आपणास ह्या आठवड्यात होताना दिसून येईल. काही विरोधकांना आपल्या बाजूस ओढण्यात सुद्धा यशस्वी व्हाल. कोर्ट - कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. बँकेचे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापार मात्र सामान्यच होईल. नोकरी करणाऱ्यांचे त्रास कमी होतील. आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपली कामे स्वतः करण्याची संवय लावावी. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रणयी जीवनात आपण आजवर ज्या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या त्या आपल्या प्रिय व्यक्तीस सांगण्याची संधी आपणास मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस खर्चांमुळे आपण चिंतीत व्हाल व त्यामुळे आपणास आपल्या प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस खूपच चांगले आहेत. आपण आपल्या वैवाहिक जीवनात सर्व सुख सोयींकडे लक्ष देऊन जोडीदाराच्या सुखासाठी बरेच काही कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घेऊन त्यावर लक्ष द्याल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना व्यक्तिगत समस्यांना बाजूस सारून आपल्या प्रिय व्यक्तीचे म्हणणे ऐकावे लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीस काही समस्या असल्यास त्याला / तिला मदत करावी. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. काही समस्या निर्माण होऊन आपल्या कामात एखादी क्षती दिसून येऊ शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या व्यावसायिक बुद्धीचा वापर करून चांगला फायदा मिळवू शकाल. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्यात शक्यतो प्रवास टाळावा.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ झाली तरी आठवड्याच्या अखेर पर्यंत ते कमी झाल्याने आपले समाधान होईल. आपण मानसिक चिंतामुक्त व्हाल. हा आपला मोठा विजय असेल. व्यापारात मोठी लाभदायी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा आपल्या तीव्र बुद्धीचे प्रदर्शन करण्याची व त्यानुसार काम करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रेम व रोमान्स टिकून राहील. आपला जोडीदार एखाद्या नवीन पोशाख खरेदीचा हट्ट करण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपली प्रिय व्यक्ती स्वतःच्या काही त्रासामुळे थोडी चिडचिड करण्याची शक्यता आहे. तिच्याशी बोलून समस्येच्या मुळाशी जाऊन त्याला / तिला खुश करण्याचा प्रयत्न करावा. प्रकृतीत थोडी सुधारणा होईल. ह्या आठवड्यात शक्यतो प्रवास टाळावा. आवश्यक असल्यास आठवड्याच्या सुरवातीस तो करावा.

जून महिन्याचा हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण आपल्या कामात तरबेज व्हाल व लोक आपल्या कामाची प्रशंसा करतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील व त्यांच्या पाठिंब्यामुळे आपणास काही फायदे मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी आपणास काही सवलती मिळू शकतात. तांत्रिक काम किंवा बांधकामाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. मशीनरी व्यापारातून सुद्धा फायदा होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होतील, परंतु एकमेकांच्या प्रयत्नाने ते निवळू शकतील. एकमेकां प्रति समजूतदारपणा वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या नात्यात जर दुरावा आला असेल तर आपला संपर्क पुन्हा सुरु होऊन नाते पुढे जाऊ शकेल. प्राप्तीत सामान्य वाढ होईल. खर्च सुद्धा सामान्यच होतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या दरम्यान आपणास मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या सासुरवाडी कडील लोकांशी वार्तालाप करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या मध्यास आपणास नशिबाची साथ मिळेल. आपल्या कामात उपयुक्त होऊ शकतील असे दूरवरचे काही प्रवास संभवतात. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी दमदार होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण लोकोपयोगी एखादे कार्य कराल व त्यामुळे समाजात आपली ख्याती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. एकमेकांत संपर्क वाढतील व त्यामुळे एकमेकां प्रति चांगली भावना निर्माण होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अत्यंत चांगला आहे. नाते रोमांसाने परिपूर्ण असेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा आनंदात व्यतीत होईल. जोडीदारास काही मोठी व चांगली सूचना मिळू शकते.

हा आठवडा आपल्यासाठी शुभ व मंगलमय आहे. आपण आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या व्यापारास गती देण्याचा प्रयत्न कराल. व्यापारासाठी आपण प्रवास कराल. दूरवरची क्षेत्रे व राज्ये ह्यांच्याशी आपले संबंध प्रस्थापित होतील. व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात लक्ष देऊन वाटचाल करावी लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकाल. कुटुंबियांशी संवाद साधून नात्यातील दुरावा दूर कराल. प्रेमीजनांना आपल्या जीवनात थोडी काळजी घ्यावी लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रिय व्यक्ती विनाकारण रागावून आपणास त्रास देऊ शकेल. आपल्या प्रिय व्यक्तीची समजूत काढून प्रेमाने संवाद साधा. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते व त्यामुळे त्यांच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!