शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 2 मे ते 8 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना सुखद अनुभव मिळणार, प्रियजनांकडून लाभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 11:44 AM

1 / 12
आठवड्यात आपले नशीब फळफळेल. आपण हौसमौज करण्याच्या मनीषेमुळे भरपूर फिराल. आपल्या प्रणयी जीवनात आनंद पसरेल. आपल्या प्रियव्यक्तीसह नवनवीन ठिकाणी फिरावयास जाणे आपणास आवडेल. कौटुंबिक आघाडीवर हा आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. नोकरीत कष्टाचे चीज होईल, तसेच वरिष्ठांशी संबंधात सुधारणा होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायी आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्र शिकण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात ताप किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. भावंडांच्या सहवासात भरपूर मजा करून हा आठवडा आपण आनंदात साजरा कराल.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास एखाद्या नवीन ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल. तेथून आपणास खूपच उपयुक्त अशी माहिती मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या आता संपुष्टात येऊ लागल्याने आपणास सुखद क्षणांचा आनंद घेता येईल. आपला जोडीदार समजूतदारपणा दाखवून आपणास प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करेल. प्रणयी जीवन सुद्धा सुखद राहील. आपली प्रियव्यक्ती आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करून आपणास आनंदात ठेवेल. नोकरीत कष्टाचे यथोचित फळ प्राप्त होईल. आपणास नशिबाची उत्तम साथ मिळाल्याने अनेकदा कमी कष्टात सुद्धा आपली कामे होतील. व्यापाराच्या बाबतीत कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार मार्गक्रमण करावे. आपल्या आर्थिक स्थितीवर अति भर पडू नये म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आपल्या व्यक्तिमत्वात व्यवहारीपणा असल्याचे दिसून येईल. आपल्या विनोदी वृत्तीने इतरांना खुश करण्याचा प्रयत्न आपण कराल.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत खूप विचार करू लागाल व त्याला / तीला खुश करण्याचा शक्य तितका प्रयत्न कराल. त्यासाठी काही नवीन खरेदी कराल. त्याच्या / तीच्या सुलभतेसाठी नवीन उपकरण खरेदी करू शकाल. आपले विचार सकारात्मक होतील. एखाद्या उत्सवात सहभागी होणे आपणास आवडेल. नवीन लोकांना भेटून आपल्या सामाजिक वर्तुळास मोठे कराल. काही प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होईल. प्रणयी जीवनात एखाद्या विशेष व्यक्तीचे आगमन संभवते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास पूर्वी केलेल्या कामाचा यथोचित परतावा मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा महत्वाचा आहे. लहान - सहान प्रवास आपला व्यापार विस्तार करण्यास मदतरूप ठरतील. आठवड्याचा उत्तरार्ध तीर्थस्थानी किंवा प्रवासास जाण्यासाठी अनुकूल आहे.
4 / 12
आठवड्याच्या सुरुवातीस आपण संबंध कसे टिकवून ठेवता हे महत्वाचे ठरेल. लोकांशी स्पष्टपणे व उत्तम संवाद साधण्यासाठी आपणास पारदर्शी राहण्याची आवश्यकता आहे. ह्या आठवड्यात आपण आपले संबंध सुरक्षित ठेवण्याची अपेक्षा बाळगाल. आठवड्याच्या पूर्वार्धात आपली प्रकृती नाजूक होण्याची शक्यता आहे. आपणास जर पायदुखी किंवा सांधेदुखीशी संबंधित एखादी समस्या असेल तर ह्या आठवड्यात ती परत उफाळून येण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी - व्यवसायात लाभ होईल. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आपण सकारात्मक राहून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक आघाडीवर पैश्यांची बचत करण्याच्या समस्येस सामोरे जावे लागेल. अचानकपणे काही खर्च करावे लागल्याने आपल्या बचतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अध्ययन मना सारखे झाले नाही तरी उत्तरार्धात नियोजनानुसार अभ्यास होऊ शकेल.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपली एखादी नवीन योजना कि ज्या योजनेसाठी आपण खूप कष्ट घेतलेत ती कार्यान्वित होईल. त्याचे आपणास उत्तम फळ मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा खूप चांगला आहे. आपण एखाद्या साहसी शिबिरास जाऊ शकाल. कष्टाचे यथोचित फळ मिळाल्याने आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी आपणास आपल्या कनिष्ठांवर सुद्धा थोडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामात यश प्राप्त होऊन प्रशंसित केले जाईल. आपल्यात दांडगा आत्मविश्वास राहील. आपले आरोग्य उत्तम राहील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या वैवाहिक जीवनास आनंदित करण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी आपण जोडीदाराच्या सहवासात जास्तीत जास्त राहण्याच्या संधी शोधून काढाल. कदाचित जोडीदारास बाहेर फिरावयास किंवा रात्री भोजनास घेऊन जाल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीस आपल्या मनातील गोष्टी सांगण्यात व विवाहाची मागणी घालण्यात यशस्वी व्हाल. ह्या आठवड्यात खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या सामाजिक समारंभाचे आयोजन करू शकाल किंवा त्यात सहभागी होऊ शकाल. नवीन ओळखी होऊन नवी मैत्री होईल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली होईल. आपण नोकरीच्या ठिकाणी जर वायफळ बोलण्यापासून दूर राहिलात तर नोकरीत पदोन्नती प्राप्त करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा विदेशी संपर्कातून फायदा मिळवून देणारा आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपण आपल्या मातेप्रती स्नेह व्यक्त कराल व तिच्या सहवासात वेळ घालविण्यास प्राधान्य द्याल. मातेची प्रकृती खालावण्याची शक्यता असल्याने आपण तिची काळजी सुद्धा घ्याल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण उत्साहाने कामे कराल व कामाचा आनंद सुद्धा घ्याल. व्यापारीवर्गाने महिलांशी हुज्जत घालणे टाळावे, अन्यथा त्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल, मात्र जोडीदाराची वागणूक आपणास आश्चर्यचकित करू शकेल. प्रेमीजनांना आपली प्रियव्यक्ती आदर्शवादी असल्याचे जाणवेल. तो / ती आपणास ज्ञानामृत पाजत असल्याचे जाणवेल व त्यामुळे आपणास त्याला / तीला समजून घेण्याची गोडी निर्माण होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने वेळेचा आनंद आपण उपभोगू शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. प्रवासामुळे आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या प्रवासात असाल. हा प्रवास विशेष आनंददायी नसल्याने थोडे सावध राहावे लागेल. प्रवासापूर्वी सर्व कागदपत्र तयार करून आपल्या आरोग्याची सुद्धा योग्य तितकी काळजी घ्यावी. आपला एखादा मित्र कि ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असेल तो आवश्यकता भासल्यास आपल्या मदतीस धावून येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल. आपल्या कष्टाचे यथोचित फळ आपणास मिळेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी दर्जाचा नसेल. आपल्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या तीव्र बुद्धीमुळे आपल्या व्यापारात सकारात्मक प्रगती होताना दिसून येईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य फलदायी आहे. विवाहितांना आपले वैवाहिक जीवन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण जर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर आपली प्रकृती बिघडू शकते, तेव्हा काळजी घ्यावी. यॊग्य व समतोल आहार घेऊन जीवनाचा आनंद उपभोगा. आठवड्याच्या मध्यास मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. आपण एखाद्या धार्मिक स्थळी देव दर्शनासाठी जाऊ शकाल. आठवड्याच्या अखेरीस कुटुंबियांसह वेळ घालवून आपण आनंदित व्हाल. नोकरीत आपली स्थिती भक्कम होऊन समस्या संपुष्टात येतील. व्यापाऱ्यांना दुरवरच्या क्षेत्रातून फायदा होईल. व्यापारासाठी आपणास नवीन रणनीती आखावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या आजारपणामुळे वैवाहिक जीवनातील काही काळ त्रासदायी होऊ शकतो. प्रणयी जीवनात आपल्या प्रियव्यक्तीने केलेल्या एखाद्या मागणीचा आपणास त्रास होऊ शकतो. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस व्यापारा निमित्त आपण एखादा प्रवास करण्याची शक्यता आहे. प्रवास चांगल्या ठिकाणी किंवा राज्यात होऊ शकेल, मात्र आपल्यासाठी तो महत्वाचा ठरू शकेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना कुटुंबियांच्या सहकार्याची गरज भासेल. आपणास उपयुक्त होईल असा सल्ला कुटुंबियांकडून आपणास मिळू शकेल. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य सुद्धा मिळेल. प्रेमीजनांना आपल्या गोड बोलण्याने प्रियव्यक्तीचे हृदय जिंकण्यात यशस्वी होता येईल. आठवड्याच्या मध्यास विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपण बँकेतील शिल्लक वाढविण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. आपल्या आकांक्षांची पूर्तता होईल. कामात यश प्राप्त होईल. योजना फलद्रुप झाल्याने प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आरोग्य उत्तम राहील. मनात धार्मिक विचार येतील. पूजा - पाठ करण्यात मन गुंतवाल. कुटुंबीयांशी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळेल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी सामान्य असला तरी व्यापाऱ्यांसाठी मोठा लाभदायी ठरणारा आहे. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होऊन खर्चात कपात कशी होईल ह्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. जर आपण त्यात यशस्वी झालात तर आठवडा आनंदात घालवू शकाल. विवाहितांना नात्यात समजूतदारपणा विकसित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. नाते सुधारण्यासाठी समस्यांवर वाद घालू नये. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपले नाजूक नाते सांभाळण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांची कामात प्रगती झाल्याने प्रशंसा करण्यात येईल. ह्या आठवड्यात व्यापार वृद्धी होऊ शकेल. बँकेतील शिल्लक वाढविण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना आपले कष्ट वाढवावे लागतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष