आठवड्याचे राशीभविष्य : 16 मे ते 22 मे 2021, 'या' राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिष्ठा वाढेल, मित्रांकडून फायदा होईल

Published: May 17, 2021 10:07 AM2021-05-17T10:07:00+5:302021-05-17T10:10:02+5:30

Weekly Horoscope 16 May to 22 May 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. तसेच आपली कौटुंबिक व्याप्ती सुद्धा वाढेल. कुटुंबात आपणास खूप मान मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या मित्रांच्या सहकार्याने आपणास जीवनात प्रगती साधण्याची संधी मिळेल. नोकरीत आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ करण्याचे विचार आपल्या मनात येतील. आपल्या बँकेतील गंगाजळीत सुद्धा वाढ होईल. कौटुंबिक व्यवसाय सांभाळणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रणयी जीवनात प्रगती होईल. आपल्या प्रियव्यक्तीसह आपण खरेदीस जाल. जीवनात जोडीदाराप्रती प्रेम वृद्धिंगत होईल. ह्या आठवड्यात आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

आठवड्यात आपण अतिशय व्यस्त राहाल. आपल्या मनात एकाच वेळी अनेक विचार येत राहतील. आपले मन विचलित झाल्याने कोणते काम आधी व कोणते काम नंतर करावे ह्याच्या विचारात आपण गोंधळून जाल. ह्याचा प्रभाव आपल्या वैवाहिक जीवनावर होताना सुद्धा दिसून येईल. ह्या दरम्यान आपण बेचैन देखील व्हाल. आपली हि बेचैनी दूर करण्यात आपल्या जोडीदाराची आपणास मदत होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. एकमेकांशी काही नवीन गोष्टींची देवाण - घेवाण कराल. एकमेकांना समजून घेतल्यामुळे परस्पर प्रेमात वाढ होईल. ह्या आठवड्यात अचानकपणे आपल्या खर्चात कपात व आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक यशामुळे आपण आनंदित व्हाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्यातील दूरदर्शीपणा व कार्यकौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना एकाचवेळी अनेक योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्या हाती काही नवे प्रकल्प येऊन त्यात त्यांचा मोठा फायदा होईल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्यात आपणास आर्थिक नियोजन अत्यंत कौशल्यपूर्वक करण्याची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात प्रचंड वाढ झाल्याने आपली प्राप्ती तोकडी पडेल. अशा परिस्थितीत खर्च भागविण्यासाठी आपणास अतिरिक्त पैश्यांची गरज भासेल. कदाचित कर्ज काढण्याची परिस्थिती उदभवू शकते, तेव्हा काळजी घ्यावी. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कुटुंबीय आपल्या मदतीस धावतील, व त्यामुळे आपणास काहीसा दिलासा मिळेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांनी सावध राहावे. आपली प्रियव्यक्ती एखाद्या कामात व्यस्त राहिल्याने किंवा बाहेरगावी गेल्याने आपणास फक्त फोनच्या माध्यमातून संवाद साधून समाधानी राहावे लागेल. विवाहितांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. विवाहितांना आपल्या जोडीदाराची फिरावयास जाण्यासाठी मानसिक तयारी करावी लागेल.

आठवड्याच्या सुरुवातीस आपण दैनंदिन कार्ये उत्तम प्रकारे करू शकाल. आपण उत्साहित होऊन प्रगती साधू शकाल. ह्या दरम्यान दैनंदिन कार्यात व्यस्त राहून सुद्धा आपण व्यक्तिगत छंदांना महत्व देऊन खरेदी, प्रवास किंवा इतर छंदांसाठी खर्च करू शकाल. जस जसे दिवस पुढे जातील तस तशी आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ लागेल. ह्या दरम्यान गुंतवणुकीचा चांगला पर्याय आपण सहजपणे निवडू शकाल. ह्या आठवड्यात आपण नाते संबंधांना प्रेमालाप व मस्ती करण्या पुरतेच महत्व द्याल. असे केल्याने आपल्या नाते संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या जवाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण झटपट निर्णय घेतल्यास समस्यांचे निराकारण करण्यास आपणास मदत होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना सतत नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. मात्र, अध्ययन करताना त्यातील अडचणी दूर करण्यासाठी इतरांच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. ह्या आठवड्यात आरोग्य चांगले राहिले तरी लहान - सहान समस्या होण्याच्या शक्यतेमुळे काळजी घ्यावी.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण एखादे नवीन काम सुद्धा हाती घ्याल. आपण जर कारखानदार असाल तर ह्या दरम्यान आपल्या उपयोगी पडेल असे एखादे नवीन मशीन खरेदी करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामात नवीन लोकांची आपणास मदत होईल. त्यामुळे कामातील कार्यक्षमता सुद्धा वाढेल. आपल्यावर नवीन जवाबदारी सोपली जाऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपल्या जोडीदाराच्या सहकार्याने आपण प्रगती साधण्याचा प्रयत्न करू शकाल. असे झाल्याने आपल्या कौटुंबिक वातावरणात सुद्धा आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सहानुभती मिळविण्याचा व प्रणय भावना प्रबळ करण्याचा आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण पूर्ण क्षमतेने आपली कामे करू शकाल. आपली मानहानी होण्याची शक्यता असल्याने अवैध कामांपासून दूर राहावे.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण स्वतःचा विचार करून त्यासाठी खूप खर्च सुद्धा कराल. त्यामुळे आपणास एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्याचे जाणवेल. आपण प्रवास करण्याचा विचार करून आठवड्या अखेरीस तो प्रत्यक्षात कराल सुद्धा. हा प्रवास आपण मित्र किंवा कुटुंबियांसह करू शकाल. मात्र, प्रवासा दरम्यान आपल्या आरोग्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा तितकासा चांगला नाही. आपल्या गैरसमजामुळे काही मतभेद होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. विवाहितांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपल्या संबंधात समजूतदारपणा व जवळीक वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, तेव्हा त्यांनी आपल्या कामावर लक्ष द्यावे. कामात कुचराई करू नये. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम फलदायी आहे. त्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यात आपला पुढाकार असेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात बाजारातील स्पर्धा वाढल्याने, आपल्या व्यापारात फायदा होण्यासाठी आपणास आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा तर लागेलच शिवाय आपल्या योजनेत सुद्धा विचारपूर्वक बदल करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपणास हव्या असलेल्या ठिकाणी आपणास बदली मिळू शकेल. ह्या आठवड्यात प्रकृती काहीशी नाजूक होण्याची शक्यता असल्याने त्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आपण आपल्याहून वयाने व ज्ञानाने सुद्धा मोठी असेल अशा व्यक्तीशी मैत्री करण्यास प्राधान्य द्याल. विवाहितांना ह्या आठवड्यात सासुरवाडीस राहावे लागण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांनी आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांशी करून देणे उचित होईल.

हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याने व आठवड्याच्या सुरवाती पासून आपण मानसिकरीत्या व्यथित झाल्यामुळे आपणास सावध राहावे लागेल. एकाच वेळी अनेक विचार आपल्या मनात थैमान घालतील व त्यामुळे आपण चिंतीत व्हाल. आपणास आर्थिक नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवावा. विवाहितांच्या जीवनात जरी आनंद पसरला तरी आपल्यातील काही लोक विवाहबाह्य संबंधात अडकून आपले वैवाहिक जीवन विस्कळीत करण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपणास आपल्या प्रियव्यक्तीसह वेळ घालविण्याची संधी मिळाल्यामुळे आपण खुश व्हाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपणास नशिबाची साथ मिळेल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपला व्यापार वाढविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, परंतु हे कष्ट करूनच आपणास यश व शांतता प्राप्त होईल. व्यापारात प्रगती होईल. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात सुद्धा वाढ होणार असल्याने आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामाचे चांगले फळ मिळेल. असे असले तरी आपणास विरोधकांपासून सावध राहावे लागेल. ते आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आपली प्रकृती चांगली राहिल्याने समस्यां पासून आपण दूर राहाल, मात्र आपल्या अंगात थोडा आळस शिरण्याची शक्यता आहे. आळस हा मोठा शत्रू असून त्या पासून स्वतःला दूरच ठेवावे. वैवाहिक जीवनात प्रेम व समजूतदारपणा वाढल्याने संबंधात दृढता येईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा मानसिक त्रासाचा आहे. ह्या आठवड्यात आपण एखाद्या बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस अपघात होण्याच्या शक्यतेमुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी. आपल्या खर्चात वाढ होईल. मानसिक त्रास वाढतील. मात्र, जस जसे दिवस पुढे जातील तस तशी परिस्थिती सुधारू लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात काही अडचणींना सामोरे जावे लागून नोकरीस धोका निर्माण होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर आहे. प्रणयी जीवनात समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना आपले मन विचलित करू पाहणाऱ्या मित्रांपासून दूर राहावे लागेल. ह्या आठवड्यात अभ्यासातील एकाग्रता कमी होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आरोग्य चांगले राहिले तरी बेफिकीर राहू नका. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. व्यापारी कामांसाठी प्रवास करू शकाल. प्राप्ती उत्तम होईल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात मात्र उत्तम होईल. सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होईल, तसेच आपल्या काही योजना कार्यान्वित होतील. असे असले तरी कौटुंबिक समस्या आपले लक्ष आकर्षित करतील. कुटुंबियांना आपली गरज भासेल. त्यांच्या मदतीस धावून जाणे आपल्यासाठी आवश्यक असेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती खालावल्याने आपल्या काळजीत भर पडू शकते. हा आठवडा नोकरी किंवा व्यापार करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यापारास गती येऊन नफ्यात सुद्धा वाढ होईल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपले आरोग्य उत्तम राहील. ह्या आठवड्यात आपले लक्ष पूजा - पाठ करण्यावर केंद्रित होईल. इतरांना मदत कराल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास विदेशातून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काहीजणांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. काही लोक स्थावराची खरेदी किंवा घराचे बांधकाम करू शकतील. त्यामुळे आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होऊन आपण आनंदित व्हाल. खर्चात वाढ झाली तरी ती आपल्या आनंदासाठीच असेल. आठवड्याच्या मध्यास खर्चात कपात होईल. आपण स्वतःचा विचार करू लागाल. आत्ममंथन करून वेळ घालवाल. नोकरीत समाधान लाभले तरी सहकाऱ्यां पासून सावध राहावे. व्यापाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यशस्वी व्हाल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!