शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahad Building Collapse: महाड दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती आली समोर; 'या' कारणामुळे इमारत कोसळल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 2:53 PM

1 / 8
महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
2 / 8
एका वृत्त वाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानं इमारत पूर्णपणे ढासळली असून संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते.
3 / 8
तसेच कोसळलेली इमारत पूर नियंत्रण रेषेत तळ्याच्या शेजारीच बांधण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या इमारतीजवळ दर पावसाळ्यात कमरेएवढे पाणी साचत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
4 / 8
महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनीअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी मडाडयेथून पथक रवाना झालं असल्याचं, माहिती समोर येत आहे.
5 / 8
बचवकार्य युद्धपातळीवर सुरु असून ढिगाऱ्याखालून एका चार वर्षांच्या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
6 / 8
तत्पूर्वी, सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. तर, आत्तापर्यंत १८ रहिवाशांचा शोध सुरु आहे. तर, ७८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
7 / 8
पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली.
8 / 8
पुणे तळेगाव दाभाडे येथून महाडकडे येणाऱ्या एनडीआरएफच्या टीमसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात येऊन कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि रायगड पोलीस यांनी विशेष सतर्कता बाळगली होती. यामुळे रात्री एक वाजून दहा मिनिटांनी NDRF चे पथक महाड येथील दुर्घटना स्थळी पोहोचून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली.
टॅग्स :RaigadरायगडBuilding Collapseइमारत दुर्घटनाPoliceपोलिस