हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे चॅनेल बंद आंदोलन, मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:35 AM2021-02-26T11:35:14+5:302021-02-26T11:56:19+5:30

Fishing community launches Channel Bandh agitation at JNPT : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही आंदोलकांना गावातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उरण - पुनर्वसनासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून जेएनपीटी येथील समुद्रात चॅनेल बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला. मोरा सागरी प्रवासी वाहतूकही बंद केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही आंदोलकांना गावातच पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.