Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 03:51 PM2021-10-17T15:51:30+5:302021-10-17T16:11:58+5:30

उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे.

भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले या नावाची नेहमीच चर्चा असते. उदयनराजेंच्या स्टाईलची चर्चा होते, त्यांच्या विधानांची चर्चा होते, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची चर्चा होते.

उदयनराजेंच्या कार कलेक्शनचीही नेहमीच चर्चा होत असते. उदयनराजेंच्या ताफ्यात आता आणखी एका कारची भर पडली आहे. उदयनराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या कारसह फोटो शेअर केला होता. त्यामध्ये, बीएमडब्लू कंपनीची ही कार दिसते.

उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे.

पुण्यातून गाडी खरेदी करतानाचा त्यांचा शोरुममधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्याला अनेकांनी दाद दिली यावरुन सोशल मीडियात उदयनराजेंची असलेली क्रेझ पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

बीएमडब्लूनेही फेसबुक अकाऊंटवरुन उदयनराजेंनी गाडी खरेदी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, उदयनराजेंना बीएमडब्लू कार देताना आम्हाला अत्यानंद झाल्याचेही बीएमडब्लू कंपनीने म्हटले आहे.

कंपनीकडून उदयनराजेंचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आहे. श्रीमंत उदयनराजे भोसले यांना BMW X5 कार देताना आम्हाला खराखुरा मनसोक्त आनंद होत आहे, असे कंपनीने म्हटले आहे. BMW च्या विश्वात आपलं स्वागत !

उदयनराजेंच्या ताफ्यामध्ये ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजेंकडे पोलो ही कार आहे.

आता, त्यांच्या या ताफ्यात गाड्यांच्या दिमतीला आणखी एक कार दाखल झाली आहे. बीएमडब्लू कंपनीची टेक्स फाईव्ह हे कारचं मॉडेल असून या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे.