Photos: पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर अखेर 'डिसमेंटल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:21 IST2022-03-23T13:52:31+5:302022-03-23T14:21:36+5:30
पुणे महानगरपालिकेने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने जम्बो कोव्हीड सेंटर बंद कारण्याचा निर्णय घेतला होता. अखेर हे कोव्हीड सेंटर डिसमेंटल करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ, दहा दिवसात हे जमीनदोस्त करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ( सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे )

राज्यात पुणे शहरात कोरोना प्रचंड वेगाने पसरू लागला होता.

रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाल्याने प्रशासनाच्या वतीने शिवाजीनगर येथे जम्बो कोव्हीड सेंटर बांधण्यात आले होते.

तिन्ही लाटांमध्ये शहराने रुग्णसंख्येत उच्चांकही गाठला होता.


सेंटरमधून बरेच रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत.

आता मागील दोन, तीन महिन्यापासून रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे.

नागरिकांनी दोन डोस घेतल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरजही भासत नाहीये




















