Rohit Pawar: लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी देणाऱ्या दाम्पत्यासह फोटो, रोहित पवार चांगलेच ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 01:48 PM2022-10-25T13:48:39+5:302022-10-25T14:22:25+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या दैनंदीन घडामोडींची माहिती ते या अकाऊंटवरुन देतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या दैनंदीन घडामोडींची माहिती ते या अकाऊंटवरुन देतात.

अनेकदा रोहित पवार हे विरोधकांवर टीका करण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियातून सत्ताधारी गटांच्या चुका दाखवत त्यांच्यावर टीका करत असतात. तसेच, मतदारसंघातील कामांसाठी कुणा मंत्र्यांची भेट घेतल्यावरही फोटो ट्विट करतात.

आपल्या मतदारसंघातील सलूनवाला, चहावाला किंवा इतराही सर्वसामान्या दुकानदारांकडे जाऊन ते सहजता दाखवात. याचे फोटोही ट्विटरवरुन शेअर करत असतात. आपल्यातील संवेदनशील राजकारणी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

रोहित पवार यांनी नुकतेच लक्ष्मी पूजनच्यादिवशी सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. त्यामध्ये, त्यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मी पूजनासाठी केरसुणी देणाऱ्या दाम्पत्याची ओळख आहे. मात्र, या फोटोवरुन रोहित पवार चांगलेच ट्रोल झाले आहेत.

माझ्या जन्मापूर्वीपासून दरवर्षी दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी काटेवाडी (बारामती) येथील ज्ञानदेव भिसे (सावळा) आणि त्यांच्या पत्नी यांनी न चुकता यंदाही घरी आणून दिली. यावेळी या प्रामाणिक आणि कष्टाळू दांपत्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

रोहित पवार यांनी चांगल्या भावनेनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, या फोटोतील संबंधित दाम्पत्याची अवस्था पाहून नेटीझन्सने आमदार पवार यांना ट्रोल केलं आहे. तसेच, काहींनी रोहित पवारांच्या हाताकडे बोट दाखवतही प्रश्न विचारले आहेत.

अनेक वर्षांपासून तुमच्या घरची सेवा करणाऱ्या या दाम्पत्यासाठी तुम्ही काय केलं, या दाम्पत्याची सेवा करा. केवळ कोरड्या शुभेच्छा देऊ नका, अशा शब्दात नेटीझन्सने त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर कमेंट केल्या आहेत.

रोहित तुम्ही सतत इमोशनल पोस्ट करून तुम्हाला लोकांबद्दल खूप प्रेम आहे असं दाखवत असता, नुसते फोटो टाकून लाईक्स मिळवण्यासाठी आणि दादा खूप चांगले आहेत त्यांना किती कणव आहे हे दाखवण्यासाठी आपण असं करता हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे.आज तुम्ही यांना भरपूर मदत करा आणि काय मदत केली हे टाका, असेही एकाने म्हटले आहे.

दादा तुमच्या जन्मापूर्वीपासून हे दांपत्या आपल्याला केरसुणी आणून देता तरी त्यांची परिस्थिती तशीच आहे का,आज तुम्ही त्यांची दिवाळी समृद्ध केल्याचा फोटो टाकला असता तर तो जास्त भावाला असता, असेही एकाने सुनावले आहे.

एकंदरीत रोहित पवार यांच्या या फोटोवर युजर्संने रिप्लाय देताना त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. तसेच, वयोवृद्ध व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवणे कितपत योग्य, असाही सवाल विचारला आहे.