Photos: पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांकडूनच किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:38 PM2022-02-11T20:38:38+5:302022-02-11T20:43:09+5:30

पुणे : किरीट सोमय्यांचा विजय असो, किरीट भाईंचा विजय असो, अशा जयघोषात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या वतीने किरीट सोमय्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातली. त्यामुळे प्रवेशद्वारावरून पोलिसांना हटण्यास भाग पाडले. महापालिका परिसरात अत्यंत गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच असंख्य नागरिकही उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यावेळी पोलिसांना कार्यकर्त्यांना आवरता आले नाही. ( सर्व छायचित्रे - तन्मय ठोंबरे )