पानशेत पुराच्या भीषण अाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 19:52 IST2018-07-12T19:46:11+5:302018-07-12T19:52:53+5:30

12 जुलै 1961 साली पुण्यातील पानशेत धरण फुटले हाेते, त्यावेळी संपूर्ण शहर पाण्याखाली हाेते.

धरण फुटल्यामुळे मुठा नदीला माेठा पूर अाला हाेता. त्यात अनेक घरांचे नुकसान झाले.

या पुरात अनेक मंदिरांचेही नुकसान झाले हाेते.

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पुण्यात येऊन या पुरात झालेल्या नुकसानाची पाहणी केली हाेती.

धरण फुटल्यामुळे धरणातील संपूर्ण पाणी वाहून गेले हाेते.