पुण्यातल्या खडकी भागातील वाॅर सिमिट्री बद्दल तुम्हाला माहितीये का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 19:38 IST2018-04-26T19:38:06+5:302018-04-26T19:38:06+5:30

दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या 1668 ब्रिटीश सैनिकांची अाठवण म्हणून त्यांच्या नावाच्या स्मृती शीला अर्थात ग्रेव्हज येथे लावण्यात अाले अाहेत.
भारतातील ब्रिटीश सैनिकांचे स्मृती शीला वेगवेगळ्या ठिकाणी जतन करणे शक्य नसल्याने या ठिकाणी ते जतन करण्यात अाले अाहेत.
या शिलांमध्ये भारतात मारल्या गेलेल्या तसेच पाकिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या शिलांचाही समावेश अाहे.
जगातील विविध देशांमध्ये असे स्मती स्थळ असून, इंग्लंडच्या काॅमनवेल्थ वाॅर ग्रेव्हज कमिशनच्यावतीने त्यांची देखभाल करण्यात येते.
जगभरातील पर्यटक या वाॅर सिमिट्रीला भेट देण्यासाठी येत असतात.