शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 9:56 AM

1 / 10
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Elections) सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना रंगला आहे. असे असले तरीही पहिल्या सर्व्हेमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्षच बाजी मारणार असल्याचे आकडे दाखविले जात होते. तेव्हा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. आता महिनाभराने पश्चिम बंगामधील परिस्थिती पुरती बदलल्याचे चित्र आहे. (Opinion poll of West Bengal Assembly Elections abp news, CNX)
2 / 10
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. यापैकी पहिला टप्प्याचे मतदान तीन दिवसांनी होणार आहे.
3 / 10
एबीपी न्यूज आणि आणि ओपिनिअन पोल सर्व्हे एजन्सी CNX सर्व्हे केला असून यामध्ये मतदार कोणाच्या बाजुने झुकले आहेत आणि बंगालच्या सत्तेची चावी कोणाकडे जाईल याबाबत मते जाणून घेतली आहेत.
4 / 10
सर्व्हेनुसार ममता यांचा पक्ष टीएमसीमध्ये आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपामध्ये कांटे की टक्कर होणार आहे. मात्र, दोन्हीपैकी एकाही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही.
5 / 10
सर्वेनुसार टीएमसीला 136 ते 146 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 130 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे बंगालमध्ये 294 जागा आहेत.
6 / 10
पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्य़ासाठी कमीत कमी 148 जागांची गरज लागणार आहे. यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची गरज लागण्याची शक्यता आहे.
7 / 10
सर्व्हेमध्ये जे आकडे आले आहेत, त्यानुसार तृणमूल आणि भाजपामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे डावे आणि काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे.
8 / 10
सर्व्हेनुसार काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 14 ते 18 जागा मिळण्य़ाची शक्यता आहे. तर अपक्षांच्या व अन्य पक्षांच्या खात्यात 1 ते 3 जागा जाऊ शकतात.
9 / 10
या आकड्यानुसार काँग्रेस, डावे आणि आयएसएफ हे पक्ष सत्तास्थापनेमध्ये किंगमेकरची भूमिका निभावू शकतात.
10 / 10
पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यानंतर 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस