उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 22:42 IST2019-01-05T22:35:19+5:302019-01-05T22:42:20+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले.
राज यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिलं.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.
राज यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मातोश्रीच्या बाहेर काही वेळ गप्पा मारत उभे होते.
शिवसेनेकडून दिला जाणारा स्वबळाचा नारा, सत्तेतून बाहेर पडण्याचे इशारे यावरुन गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं होतं. तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते. यामुळे उद्धव आणि राज यांच्यात नात्यात कटुता आली होती.
2012 मध्ये उद्धव ठाकरेंच्या अँजिओप्लास्टीनंतर राज ठाकरे स्वत: गाडी चालवत त्यांना मातोश्रीपर्यंत सोडायला आले होते. त्याच घटनेची आठवण अनेकांना आजच्या भेटीनंतर पुन्हा एकदा झाली.