शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंह यांचे भाजपा नेत्याशी कनेक्शन, विदर्भातील या बड्या नेत्याचे आहेत व्याही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 19:39 IST

1 / 5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पाठवलेल्या पत्रामधून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
2 / 5
दरम्यान, परमबीर सिंह आणि भाजपाच्या एका नेत्यामध्ये असलेल्या नातेसंबंधांबाबत माहिती समोर आली आहे. परमबीर सिंह हे भाजपा नेते सागर मेघे यांचे व्याही आहेत. सागर मेघे यांच्या कन्या राधिका यांचा विवाह परमबीर सिंह यांचे पुत्र रोहन सिंह यांच्याशी झाला होता.
3 / 5
हा विवाह सोहळा २०१७ मध्ये बंगळुरू येथे झाला होता. त्यावेळी या विवाह सोहळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. हा विवाह सोहळा खूप महागडा होता अशी चर्चा होती.
4 / 5
सागर मेघे हे विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत. दत्ता मेघे हे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. २०१४ नंतर त्यांनी आपल्या पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता.
5 / 5
दरम्यान, परमबीर सिंह यांनी काल मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचे कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.
टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगSagar Megheसागर मेघेPoliceपोलिसPoliticsराजकारण